AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण, अमेरिकेनं युद्ध थांबवलंच नाही तर भारतात उसळणार महागाईचा आगडोंब, काय काय होणार महाग? वाचा संपूर्ण यादी

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम आहे, मात्र आता हा युद्धविराम संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत. परंतु जर अमेरिका आणि इराणने युद्ध थांबवलं नाही तर भारताला महागाईचा प्रचंड फटका बसणार आहे.

इराण, अमेरिकेनं युद्ध थांबवलंच नाही तर भारतात उसळणार महागाईचा आगडोंब, काय काय होणार महाग? वाचा संपूर्ण यादी
InflationImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 2:59 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती, हे युद्ध तब्बल 39 दिवस चाललं, 40 व्या दिवशी अखेर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. हा युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी देखील पाकिस्तानातच होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फोन केला होता. मात्र यावेळी त्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात सुनावले आहे, जोपर्यंत तुम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूजची नाकेबंदी उठवत नाहीत, तोपर्यंत इराणसोबत युद्धविरामाबाबतची चर्चा पुढे होऊ शकत नाही असं मुनीर यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. समजा इराण आणि अमेरिकेत युद्धविराम झालाच नाही आणि युद्ध सुरूच राहिलं तर त्याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसणार आहे. भारतामध्ये महागाईचा आगडोंब उसळणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण ऊर्जा क्षेत्रात जवळपास पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहोत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. आपण आपल्या एकूण गरजेच्या तब्बल 85 टक्के कच्च तेल इतर देशांकडून आयात करतो. त्यातील मोठ्या प्रमाणात तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा आपल्याला आखाती देशांकडून होतो. त्यामुळे जर समजा युद्ध सुरूच राहिलं तर भारताला सर्वात मोठा फटका हा ऊर्जा क्षेत्रात बसणार आहे. भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती भविष्यात वाढू शकतात.

एका रिपोर्टानुसार ओमान, कतार, साऊदी अरेबिया आणि यूएई हे खतांचे सर्वात मोठे निर्यातदार देश आहेत. मात्र जर युद्ध सुरूच राहिलं तर या देशांमधून भारतात होणारा खतांचा पुरवठा ठप्प होऊ शकतो, त्यामुळे देशात खतांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच खाण्या-पिण्याच्या वस्तू देखील महाग होऊ शकतात. साबण निरमा यासारख्या प्रोडक्टच्या किंमती देखील वाढणार आहेत. काही कंपन्यांनी तर यापूर्वीच आपल्या वस्तूंचे दर वाढवले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...