AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train Ticket : रेल्वे प्रवाशांना हे माहिती असणं गरजेचं, जर तिकीट हरविले तर काय करायचं, पुन्हा तिकीट काढायचं? काय आहे नियम

रेल्वेने प्रवासाला निघालाय आणि तिकीटच हरवलं तर काय करायचं, प्रवास करता येतो का ? काय आहे रेल्वेचा नियम पाहा

Train Ticket : रेल्वे प्रवाशांना हे माहिती असणं गरजेचं, जर तिकीट हरविले तर काय करायचं, पुन्हा तिकीट काढायचं? काय आहे नियम
train Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 28, 2023 | 2:42 PM
Share

नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : रेल्वे प्रवासात तिकीट काढून प्रवास करायचा असतो. अधिकृत तिकीटाशिवाय प्रवास केल्यास आपल्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्लॅटफॉर्मसाठी देखील स्वतंत्र तिकीट ( Train Ticket ) काढावी लागते. परंतू काही वेळा तिकीट काढल्यानंतर ती हरविली जाण्याचा प्रकार घडतो. तेव्हा रेल्वे प्रवाशांना प्रचंड टेन्शन येऊ शकते. प्रवासी संकटात सापडतात. तिकीट घरी विसरले  ( Train Ticket Lost )  असेल किंवा आरक्षित तिकीट विसरले असेल तुम्हाला प्रवास करण्याचा अधिकार आहे की नाही ? जर ट्रेनमध्ये आपण तसेच चढलो तर दंड भरावा लागतो का ? पाहूयात काय आहेत यासंदर्भात नियम…

रेल्वेचा प्रवास करताना तिकीट जर हरविले तर काही चिंता करण्याची गरज नाही. तिकीट हरविले तर तुम्ही डुप्लिकेट तिकीट काढून प्रवास करु शकता. वेगळ्या – वेगळ्या श्रेणीच्या डुप्लीकेट तिकीटाचे नियम वेगवेगळे आहेत. प्रवासी ट्रेनमध्ये तिकीट तपासणीसाकडे ( टीटीई) जाऊन त्यांच्याकडून डुप्लिकेट तिकीट बनवू शकता. तिकीट काऊंटरवरही डुप्लीकेट तिकीट मिळवू शकता.

डुप्लीकेट तिकीटाचा नियम

भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट indianrail.gov.in अनूसार डुप्लिकेट तिकीट बनविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागू शकते. सेंकड आणि स्लीपर क्लासचे डुप्लिकेट तिकीट तयार करायला 50 रुपये. त्यावरील श्रेणीसाठी डुप्लीकेट तिकीट तयार करायला 100 रुपये फि द्यावी लागते. जर रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर कन्फर्म तिकीट हरविले तर भाड्याच्या 50 टक्के शुल्क भरावे लागते. जर हरविलेले तिकीट सापडले तर आपण दोन्ही तिकीटे दाखवून काऊंटरवरून डुप्लीकेट तिकीटासाठी भरलेले पैसे परत मिळवू शकता.

तर डुप्लीकेट तिकीट बनवता येत नाही

जर काही कारणाने तिकीट कन्फर्म झाल्यानंतर फाटले तर डुप्लीकेट तिकीट भाड्याचे 25 टक्के शुल्क भरुन तयार करता येते. परंतू जर वेटींगलीस्टचे तिकीट हरविले असेल किंवा फाटले असेल तर डुप्लीकेट तिकीट तयार करता येत नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?