AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट, महाराष्ट्रातील या भागासह अनेक राज्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Weather Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट, महाराष्ट्रातील या भागासह अनेक राज्यांना अलर्ट जारी
Rain Alert NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 10, 2026 | 10:40 PM
Share

राज्यासह संपूर्ण देशात गेल्या काही काळापासून अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिनमध्ये उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या काही भागात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्येही ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांत उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि मध्य भारतातही पावसाची शक्यता

पूर्व आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सोमवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे. झारखंड आणि ओडिशामध्ये काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्येही ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण भारतात कसे असेल हवामान?

दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जनेसह वातावरण राहण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. तेलंगणामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नॉर्थईस्टमध्ये कसं असेल हवामान?

आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी जारदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मेघालय आणि आसाममधील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने या काळात झाडे आणि वीज खांबांपासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?