AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात लागू करा NRC, SIR वादादरम्यान RSS ची मोठी मागणी

RSS Sunil Ambekar Reaction on NRC: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा देशात एनआरसी लागू करण्याची मागणी केली आहे. सध्या देशात मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रिया, SIR वरून वाद सुरू असतानाच आता संघाच्या मागणीने वादाला फोडणी बसणार आहे.

देशात लागू करा NRC, SIR वादादरम्यान RSS ची मोठी मागणी
सुनील आंबेकरक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
| Updated on: Oct 01, 2026 | 10:05 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय नागरीक नोंदणी (National Register of Citizens-NRC) लागू करण्याची मागणी केली आहे. सध्या देशात निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रिया, SIR वरून वादंग उठलेले असतानाच संघाच्या मागणीने या वादाला फोडणी बसली आहे. NRC वरून देशात वादाला होऊ शकतो. संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही मागणी केली आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी नागरिकांची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच देशात एनआरसी लागू व्हायला हवी असे मत त्यांनी जोरकसपणे मांडले.

‘इंडियन एक्सप्रेस’ मधील वृत्तानुसार, आंबेकर यांनी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टसमध्ये बोलताना देशात एनआरसी लागू झाल्यास देशात घुसखोरीची समस्या समूळ नष्ट होईल असा दावा केला आहे. देशातील काही भागात लोकसंख्येचे असंतुलन कमी होण्यास यामुळे मदत होईल असे मतही त्यांनी मांडले. पश्चिम बंगाल, आसामासह इतर काही राज्यात घुसखोरांच्या वाढत्या अतिक्रमणाची समस्येवर त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोट ठेवले आहे.

नागरिकत्वाची ओळख गरजेची

आंबेकर म्हणाले की, देशात कोण भारतीय नागरिक आहेत आणि कोण नाहीत, याची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकत्वाविषयी संबंधित कोणताही आक्षेप असेल तर त्याच्या समाधानासाठी कायदेशीर व्यवस्था आहे. जर एखाद्याला वाटले तर न्यायालयीन व्यवस्थाही आहे.

एसआयआर प्रक्रियेविषयी काय म्हणाले सुनील आंबेकर?

सुनील आंबेकर यांनी एसआयआर प्रक्रियेचे समर्थन केले आहे. देशातील लोकांची ओळख पटविणे गरजेचे आहे. काही लोक अवैध मार्गाने मतदार यादीत समाविष्ट झालेले आहेत. देशात लोकसंख्या बदलाचा मोठा इतिहास राहिलेला आहे. देशाची स्वतःची एक वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. हा प्रश्न लोकसंख्या संतुलन ठेवण्याचा आहे, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष एसआयआरवरून आक्रमक

एसआयआर मुद्दावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगही संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गडबड केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने SIR प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विरोधी पक्ष देशात ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलन करणार आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Follow Us
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?