AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi: खरा हिरो तर हाच! विमान क्रॅश होण्यापासून वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित माछर यांच्या धाडसाचे मोदींकडून कौतुक

Fly Dubai Hijack Smit Machchhar: दुबईहून इस्त्रायलमध्ये जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानाला क्रॅश होण्यापासून वाचवाणारे भारतीय कॅप्टन स्मित माछर यांची जगभर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कौतुक केले आहे.

PM Modi: खरा हिरो तर हाच! विमान क्रॅश होण्यापासून वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित माछर यांच्या धाडसाचे मोदींकडून कौतुक
कॅप्टन स्मित माछर, पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Oct 01, 2026 | 8:50 AM
Share

PM Narendra Modi on Smit Machchhar: काल एका थरारनाट्याने जग हादरले. पण त्याचवेळी एका भारतीयाने दाखवलेल्या अफाट साहसाने जग स्तंभित झाले. दुबईहून इस्त्रायल जाणाऱ्या फ्लाय दुबई या विमानाला क्रॅश होण्यापासून भारतीय कॅप्टन स्मित माछर यांनी वाचवले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माछर यांनी ‘हिरो’ संबोधले आहे. एका भयंकर परिस्थितीत जखमी असूनही त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी हिंमत आणि अतूट साहस दाखवल्याची शाबासकी मोदी यांनी दिली. त्यांच्या धाडसामुळे अनेक विमान प्रवाशांचे प्राण वाचले आणि एका मोठे संकट टळले. भारताला माछर यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

कॉकपिटमध्ये कॅप्टन माछर यांच्यावर चाकू हल्ला

कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित माछर हे भारतीय पायलट होते. बुधवारी, 30 सप्टेंबर रोजी फ्लायदुबई या विमानाने उड्डाण घेताच, या विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. कॉकपिटमध्ये माछर यांनी मोठी भूमिका निभावली. वृत्तानुसार, फ्लाईट FZ 1073 च्या कॉकपिटमध्ये एकच गोंधळ उडाला. ओमानच्या एका पायलटने कथितरित्या हे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर हे विमान क्रॅश करण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान झटापट झाली. ओमानच्या पायलटने माछर यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात त्यांना यश आले. प्रवाशांनी लागलीच हात शिरून दुसऱ्या पायलटला ताब्यात घेतले.

प्रवाशांचेही प्रसंगावधान

इस्त्रायलच्या तेल अवीवमध्ये विमान उतरल्यावर प्रवाशांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या घटनेची माहिती दिली. कॅप्टन माछर हे गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी विमानाचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशी कॉकपिटमध्ये शिरले आणि त्यांनी ओमानच्या पायलटला ताब्यात घेतले. यावेळी विमानात इतर दोन पायलटही उपस्थित होते. त्यांनी हे विमान सुरक्षित उतरवण्यासाठी मदत केली. हे विमान तात्काळ सौदी अरबकडे वळवण्यात आले आणि आपात्कालीन स्थिती विमान उतरवले. वृत्तानुसार, या घटनेत जखमी कॅप्टन माछर यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

2022 पासून फ्लाईदुबईमध्ये कॅप्टन माछर

कॅप्टन स्मित माछर हे जून 2022 पासून फ्लाईदुबईमध्ये कॅप्टन म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी जवळपास 11 वर्षे स्पाईसजेटसोबत काम केले आहे. तिथे ते सीनियर कमांडर म्हणून काम करत होते. माछर यांनी लाईन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून जवाबदारी सांभाळली आहे. त्यांनी पायलटला प्रशिक्षण दिले आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...