रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता केवळ याच लोकांना मिळणार लोअर बर्थ, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले कारण
Lower berth of Train : रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवास करताना लोअर बर्थसाठी अनेक जण आग्रही असतात. पण आता याच प्रवाशांना ही आसन मिळणार आहे. याविषयीचा निर्णय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला आहे.

भारतासारख्या विशाल देशात रेल्वे हे किफायतशीर दळणवळणाचे साधन आहे. रोज कोट्यवधी प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. त्यातच अनेकांचा लोअर बर्थचा (Lower Berth) आग्रह असतो. कारण येथे इतर बर्थप्रमाणे चढउतर करण्याची गरज नसते. तसेच बर्थ खाली सामान ठेवण्याची सोय असते. उठून बसता येते. स्टेशन आले तर तात्काळ उतरता येते. पण आता केवळ याच प्रवाशांना लोअर बर्थ मिळणार आहे. काय आहे तो रेल्वे मंत्रालयाचा निर्णय?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेतील हे खालील आसन बसण्यासाठी आणि आरामासाठी योग्य मानण्यात येते. अनेक जण त्यासाठी आग्रही असतात. आता रेल्वे मंत्र्यांच्या मते ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवासासाठी लोअर बर्थ राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यांना प्राधान्याने हे सीट देण्यात येईल.
लोअर बर्थ कोणासाठी राखीव
रेल्वे मंत्र्यांच्या मते, आता ट्रेनमधील लोअर बर्थ हा दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येईल. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यांना हे सीट देताना प्राधान्य देण्यात येईल.
- ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens)
- दिव्यांग प्रवासी (Differently Abled Passengers)
- महिला, खासकरून गर्भवती महिला आणि एकटीने प्रवास करणाऱ्या महिला
सगळ्यांना लोअर बर्थ मिळणे अशक्य
रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोअर बर्थची संख्या मर्यादित असते. त्यामुळे सर्वच प्रवाशांना ती उपलब्ध करून देणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे ज्यांना या लोअर बर्थ सीटची सर्वाधिक गरज आहे, त्यांना प्राधान्याने ती देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
कोचमध्ये किती लोअर बर्थ?
ट्रेनमध्ये वेगवेगळा क्लास आणि कोच असतो. त्यानुसार लोअर बर्थची संख्या मर्यादित असते.
स्लीपर कोच (SL)
प्रत्येक कोचमध्ये जवळपास 6 ते 7 लोअर बर्थ असतात
थर्ड एसी (3AC)
प्रत्येक कोचमध्ये 4 ते 5 लोअर आसन असतात
सेकंड एसी (2AC)
याठिकाणी 3 ते 4 लोअर बर्थ असतात
थर्ड AC इकोनॉमी आणि चेअर कार
खासकरून दिव्यांग प्रवाशांसाठी 4 लोअर बर्थ राखीव असतात.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नेहमी दिव्यांग प्रवाशांना प्राथमिकता देण्यात येते. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान चढउतार करणे सोपे जाते. स्लीपर कोचमध्ये 2 लोअर बर्थ आणि थर्ड एसी, इकोनॉमी मध्ये 4 बर्थ हे त्यांच्यासाठी राखीव असतात.
