6 वर्षांत सशस्त्र दलाच्या 680 जवानांची आत्महत्या तर दुर्घटनांमध्ये 1,764 जवानांचा मृत्यू

जवानांची आत्महत्या आणि अपघाती मृत्यू झालेली ही आकडेवारी 2015 ते 2020 दरम्यानची आहे. याकालावधीत विविध चकमकींमध्ये 323 जवानांना वीरमरण आलं आहे.

6 वर्षांत सशस्त्र दलाच्या 680 जवानांची आत्महत्या तर दुर्घटनांमध्ये 1,764 जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) च्या तब्बल 680 जवानांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या जवानांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि सीमा सुरक्षा दलामधल्या (BSF) जवानांचा समावेश आहे. याशिवाय वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 1 हजार 764 जवानांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. (In 6 years, 680 Armed Forces personnel committed suicide and 1,764 personnel died in accidents)

चकमकींमध्ये 323 जवानांचा मृत्यू

राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. जवानांची आत्महत्या आणि अपघाती मृत्यू झालेली ही आकडेवारी 2015 ते 2020 दरम्यानची आहे. याकालावधीत विविध चकमकींमध्ये 323 जवानांना वीरमरण आलं आहे.

घरगुती, आर्थिक कारणांमुळे आत्महत्या

2015 ते 2020 या सहा वर्षांत सशस्त्र दल आणि आसाम रायफल्सने दिलेल्या आकडेवारीनुसार 680 जवानांनी मृत्यूला कवटाळलं. आत्महत्येमागे सर्वात प्रमुख कारण हे कौंटुंबिक असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय आर्थिक विवंचना आणि आजारपणाला कंटाळूनही काही जवानांनी आत्महत्या केली असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

2014 ते 2018 दरम्यान 2 हजार 200 जवानांचा मृत्यू

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने दिलेल्या आकडेवारीनुसार 2014 ते 2018 या पाच वर्षांच्या काळात केंद्रीय सशस्त्र पुलिस दलाच्या (CAPF) 2 हजार 200 जवानांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये सीएपीएफच्या 104 जवानांचा दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला तर 28 जणांनी आत्महत्या केली होती. यावर्षी 132 जवानांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. (In 6 years, 680 Armed Forces personnel committed suicide and 1,764 personnel died in accidents)

 

इतर बातम्या :

Maratha Reservation : 102 व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळणार

Maratha Reservation : ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांची केंद्राकडे महत्वाची मागणी

भारतासाठी कही खुशी, कही गम, लवलीनाला कांस्य, पैलवान रवीचं पदक निश्चित, महिला हॉकी लढतीकडे लक्ष

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI