Goa Drunk & Drive : गोव्यात मद्यधुंद पर्यटकाचा गाड्यांना ठोकण्याचा प्रयत्न, मैत्रिणीसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील हा इंजिनिअर तरुण आपल्या मैत्रिणींसह गोवा फिरायला आला होता. यावेळी बुधवारी संध्याकाळी त्याने खूप दारु प्यायला होता. दारुच्या नशेतच तो पणजी शहरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. गाडी चालवत असताना त्याने अनेक गाड्यांना ठोकण्याचा प्रयत्न केला. वेळीच ही बाब जवळच असणाऱ्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या लक्षात आली.

Goa Drunk & Drive : गोव्यात मद्यधुंद पर्यटकाचा गाड्यांना ठोकण्याचा प्रयत्न, मैत्रिणीसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गोव्यात मद्यधुंद अवस्थेत गाड्यांना ठोकर देण्याचा प्रयत्न कराणाऱ्या पर्यटकाला अटक
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 02, 2022 | 4:40 PM

गोवा : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालून गाड्यांना ठोकर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पर्यटका (Tourist)ला गोवा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पणजी शहरात बुधवारी रात्री ताब्यात (Detained) घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान या घटनेनंतर त्या मद्यधुंद तरुणाच्या या कृत्यामुळे त्याच्या पत्नी व त्याच्या मैत्रिणीमध्ये जोरदार भांडणही सुरू झालं होते. सदर आरोपी तरुण मूळचा असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुण्यातून गोव्याला तो मैत्रिणींसोबत पिकनिकसाठी गेला होता. यावेळी त्यांनी दारुची पार्टी (Alchohol Party) केली. मद्यधुंद अवस्थेत तो पणजी शहरात गाडी चालवत असताना गोवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा पोलिसांनी रात्री उशिरा या तरुणांसह त्याच्या मैत्रिणीलाही ताब्यात घेतलं.

दारुच्या नशेत पणजी शहरात गाडी चालवताना घेतले ताब्यात

पुण्यातील हा इंजिनिअर तरुण आपल्या मैत्रिणींसह गोवा फिरायला आला होता. यावेळी बुधवारी संध्याकाळी त्याने खूप दारु प्यायला होता. दारुच्या नशेतच तो पणजी शहरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. गाडी चालवत असताना त्याने अनेक गाड्यांना ठोकण्याचा प्रयत्न केला. वेळीच ही बाब जवळच असणाऱ्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या तरुणाला गाडीसह ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा तरुण आपल्या मैत्रिणीसह मद्यधुंद अवस्थेत गाडीत फिरत होता. ही गोष्ट त्याच्या पत्नीच्या लक्षात येताच दोघींमध्ये जोरदार भांडणही झालं. याप्रकरणी गोवा पोलीस पुढील कारवाई करत आहेत. (In Goa a tourist was arrested for trying to hit a vehicle while intoxicated)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें