दीराने लग्न केले तर चिडली वहिनी, शेतात बोलावले आणि नंतर जे घडले त्याने आयुष्य उद्धवस्थ झाले..

एका चार मुलांच्या आईला तिचा दीर आवडू लागला होता. तिचा पती कामाला गेल्यानंतर त्यांच्या दोघांत प्रेम फूलू लागले. मात्र, दीराचे वय लग्नाचे झाल्याने त्याला स्थळं येऊ लागली तशी ती बचैन होऊ लागली...

दीराने लग्न केले तर चिडली वहिनी, शेतात बोलावले आणि नंतर जे घडले त्याने आयुष्य उद्धवस्थ झाले..
file photo
| Updated on: May 10, 2026 | 11:18 PM

२० वर्षीय सुधीर याचे त्याच्या नात्यातील एका भाभीशी प्रेमसंबंध जुळले होते. विशेष म्हणजे ही महिला चक्क चार मुलांची आई होती. सुधीर याचे लग्न ६ मे रोजी झाले. सुधीर याचे लग्न जसे झाले तसे या विवाहित महिलेचे टाळके सटकले. त्यानंतर या चार मुलांच्या आईने सुधीर या आपल्या शेतात बोलावले आणि तेथे असे काही केले की तिला आता कुठेच तोंड दाखवायची जागा राहिली नाही.

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील ही सनसनाटी घटना आहे. ज्या घटनेला ऐकून जो तो दंग झाला आहे. येथील एका चार मुलांच्या विवाहित महिलेने तिच्या प्रियकराच्या ( जो नात्यात तिचा दीर लागतो ) लग्नाला विरोध केला. त्यानंतर तिने दीराला शेतात बोलावले. त्यानंतर महिलेने नाराज होऊन आपल्या प्रियकराला शेतात जवळ बोलावले. त्यानंतर तिने त्या प्रियकराचा थेट प्रायव्हेट पार्टच ब्लेडने कापला. या अनैतिक संबंधातून घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

घटना पाली ठाणे क्षेत्रातील गुजदेई गावातील आहे. २० वर्षाच्या सुधीर याच्याशी चार वर्षांपासून नात्यातीलच एका विवाहित महिलेशी संबंध सुरु होते. सुधीर याने लग्न केल्याने चिडलेल्याने महिलेने बदला घेण्याचे निश्चित केले. शनिवारी महिलेने सुधीर याला शेतात बोलावले आणि त्यांच्या भांडण सुरु झाले. महिलेने तिच्या हातातील ब्लेडने सुधीर याचे गुप्तांग कापले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सुधीर वेदनेने ओरडू लागला.

महिलने कहाणी बदलली

सुधीरवर झालेल्या हल्ल्याने तो जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या दिशेने धावला, त्यावेळी ही महिला देखील त्याच्या मागे धावली. रस्त्यावर दोघांमध्ये भांडण सुरुच होते. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमले. स्वत:ला कोंडल्याचे पाहून महिलने लागलीच कहाणी बदलली. आणि सुधीरवरच आरोप केला की ती बँकेत जात होती. त्यावेळी सुधीरने तिला थांबवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बचावात आपण हा हल्ला केल्याची कहाणी तिने जमलेल्या लोकांना सांगितली.

या प्रकरणात तपास सुरु

गंभीर जखमी झालेल्या सुधीर याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सांगितले प्राथमिक तपासात ही घटना प्रेमप्रकरण आणि दुश्मनीतून झाल्याचे समजते या प्रकरणाचा छडा लावला जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us