AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP | भाजपाने केंद्रीय मंत्री, खासदारांना थेट विधानसभेची उमेदवारी का दिली? काय आहेत 5 संकेत?

BJP | 3 केंद्रीय मंत्री, 7 खासदारांना निवडणुकीच्या रणमैदानात उतरवण्याची वेळ भाजपावर का आली?. भाजपाची ही कुठली रणनिती आहे? भाजपाला यातून काय साध्य करायच आहे? जाणून घ्या.

BJP | भाजपाने केंद्रीय मंत्री, खासदारांना थेट विधानसभेची उमेदवारी का दिली? काय आहेत 5 संकेत?
Assembly Election 2023
| Updated on: Sep 27, 2023 | 8:57 AM
Share

भोपाळ : आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन मोठी खळबळ उडालीय. भाजपाने सोमवारी यादी जाहीर केली. मध्य प्रदेशातीलच अनेक भाजपा नेते या यादीमुळे हैराण झाले आहेत. काँग्रेसचे रणनितीकार सुद्धा या यादी मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा उमेदवारांची यादी शानदार असल्याच सांगितलं. भाजपाचा विजय रथ निघाला आहे, असं ते म्हणाले. आपलं पावणेचार वर्षाच कामकाज शानदार असल्याच शिवराज सिंह चौहान म्हणाले. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांच्या टीमचे आभार मानले. “हे अद्भुत आणि अभूतपूर्व आहे. याने भारतीय जनता पार्टीचा महाविजय सुनिश्चित केला आहे. आमचे सर्व दिग्गज नेते निवडणूक लढतील. मुख्य समस्या काँग्रेसची आहे. त्यांना काही समजतच नाहीय. काय होतय हेच त्यांना कळत नाहीय. भाजपाच निरंतर विजयपथावर मार्गक्रमण सुरु आहे” असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.

भाजपाने सोमवारी ज्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यात 7 खासदारांमध्ये 3 केंद्रीय मंत्री आहेत. कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल, खासदार राकेश सिंह, खासदार गणेश सिंह, खासदार रीति पाठक हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. या यादीतील आठव नाव भाजपा सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचं आहे. हे अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.

आधीपासूनच जे लोक खासदार किंवा केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना भाजपाने का तिकीट दिलय? यामागे काय रणनिती आहे?

मुख्यमंत्रीपदाचा पर्याय खुला – जितके मोठे चेहरे या निवडणुकीत उतरलेत, त्यापैकी कोणीही मुख्यमंत्री बनू शकतो. लोकप्रियतेची परीक्षा – नरेंद्र मोदींच्या नावावर लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्यांच्या लोकप्रियतेची टेस्ट आवश्यक आहे.

सत्ताविरोधी लाट – मागच्या 18 वर्षापासून भाजपा सत्तेवर आहे. त्यामुळे प्रस्थापित सरकारविरोधात एक लाट असते. मोठे चेहरे निवडणुकीत उतरवून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो.

सीट टू सीट मार्किंग- हरलेल्या जागांवर मोठ्या नेत्यांना लढवून विधानसभेची प्रत्येक जागा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, हाच भाजपाला संदेश द्यायचा आहे.

एक कुटुंब एक उमेदवार – भाजपाने जालम सिंह पटेल यांचं तिकीट कापलं. त्यांच्या भावाला केंद्रीय मंत्री प्रह्लाद सिंह पटेलला विधानसभेची उमेदवारी दिली. म्हणजे एक कुटुंब एक उमेदवार हाच संदेश यातून द्यायचा असेल. मध्य प्रदेशात भाजपा एका नव्या फॉर्म्युल्याने निवडणूक लढवतय हे स्पष्ट आहे. हे धक्कातंत्र आहे. आता हा फॉर्म्युला चालल्यास अन्य राज्यातही त्याची अमलबजावणी होऊ शकते. भाजपाने आतापर्यंत 78 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ज्या जागा गमावल्या होत्या, तिथूनच भाजपाने उमेदवारी जाहीर केलीय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.