‘या’ राज्यात पहाटे तीन वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट्समध्ये मिळणार दारु, निर्णयानंतर राजकारण तापले, भाजपा, काँग्रेसचा विरोध

दिल्ली सरकारने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पहाटे तीनपर्यंत दिल्ली राज्यातील नागरिकांना बारमध्ये दारु दिली जाणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत अबकारी विभागाला दिल्ली सरकारने आदेश जारी केले आहेत, या आदेशाचे अधिकृत पत्र लवकरच जारी करण्यात येणार आहे.

'या' राज्यात पहाटे तीन वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट्समध्ये मिळणार दारु, निर्णयानंतर राजकारण तापले, भाजपा, काँग्रेसचा विरोध
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 4:36 PM

नवी दिल्ली बार आणि रेस्टॉरंट्समध्ये (Bar and Restaurants) पहाटे तीनपर्यंत दारु देण्याची परवानगी दिल्ली (Delhi Government)राज्यात बार चालकांना मिळाली आहे. दिल्ली सरकारने हा धोरणात्मक (liquor policy)निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पहाटे तीनपर्यंत दिल्ली राज्यातील नागरिकांना बारमध्ये दारु दिली जाणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत अबकारी विभागाला दिल्ली सरकारने आदेश जारी केले आहेत, या आदेशाचे अधिकृत पत्र लवकरच जारी करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या २०२१२२ च्या नव्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीत सध्या रेस्टॉरंट आणि बारना रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. जर ही वेळ पहाटे तीनपर्यंत करण्यात आली तर अबकारी विभाग पोलीस आणि इतर विभागांसोबत काम करेल. नोव्हेंबर २०२१ मध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या धोरणानुसार शेजारी असलेल्या शहरांच्या वेळांप्रमाणे दिल्लीतील बारच्या वेळा असाव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे.

एनसीआर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये पहाटे तीनपर्यंत परवानगी

दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर, हरियाणातील गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये पहाटे तीनपर्यंत बार सुरु ठेवण्यास आधीच परवानगी आहे. . प्रदेशात नोएडा आणि गाझइयाबादमध्ये बारना रात्री एक पाजेपर्यंत पवानगी आहे. दिल्ली हे राजधानीचे शहर आहे, या शहरात सुमारे ५५० स्वतंत्र रेस्टॉरंट आहेत, ज्यात महसूल विभागाच्या लायसन्सवर भारतीय आणि परदेशी दारु दिली जाते. तर सुमारे १५० रेस्टॉरंट्स, मॉटेल्स असे आहेत की ज्यात २४ तास दारु दिली जाते. अशा रेस्टॉरंट्सना विशेष लायसन्स दिले जाते.

हे सुद्धा वाचा

भाजपाने केला विरोध

भाजपाने दिल्ली सरकारच्या या निर्णयावर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपाचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करुन या निर्णयावर टीका केली आहे. हर्षवर्धन लिहितातएकाबाजूला दिल्लीत पाणीटंचाईची स्थिती असताना दिल्ली सरकारने नव्या मद्य धोरणानुसार, दारुची दुकाने पहाटे तीनपर्यंत देण्यास परवानगी दिली आहे. हा निर्णय आप सरकारची जनविरोधी मानसिकता दर्शवतो आहे. जनतेला स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याऐवजी मद्य पाजणे ही आपची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दारुमाफियांशी आघाडी केल्याचा परिणामकाँग्रेस

दिल्लीकरांचा विरोध असतानाही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पहाटे तीनपर्यंत दारु मिळण्यास सरकारने परवानगी दिली आहे. दिल्लीला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे अरविंद केजरीवाल यांनी ठरवले असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर हॉटेल संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.