पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले

उत्तर प्रदेशातील आंबडेकर नगरात चार मुलांची हत्या आईनेच केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणात आईने पतीच्या दुसऱ्या विवाहामुळे मुलांची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.

पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले
Uttar Pradesh massacre
| Updated on: May 03, 2026 | 10:25 PM

उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरातील मीरानपुरातील एका हत्यांकाडाने खळबळ उडाली आहे. एका मातेने आपल्या चार अल्पवयीन मुलांची निघृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  प्राथमिक  तपासात आरोपी महिलेचा पती नियाझ अहमद याने सौदीत दुसरा विवाह केला आहे. ज्या महिलेशी त्याने विवाह केला आहे ती पाकिस्तानची रहिवासी आहे. नियाझ चार वर्षांपासून भारतात आलेला नाही. त्याची पहिली पत्नी गाझिया ही चार मुलांसोबत मीरानपुरात दोन मजली घरात राहात होती. पतीच्या बेवफाईमुळे धडा शिकवण्यासाठी तिने या चार मुलांची हत्या केल्याचा संशय आहे.

नियाझ अहमद याचा 17 वर्षांपूर्वी भीटीच्या सम्मनपुर येथील गाझिया हिच्याशी निकाह झाला होता. त्यांना शफीक (14), सऊद (12), उमर (10) आणि मुलगी बयान (8) अशी चार मुले झाली होती. गाझिया ही नियाझ याचा मामा मोहम्मद फैजान याची मुलगी आहे. त्याने आंबेडकर नगरात मीरानपुर मुरादाबाद गल्लीत पत्नीच्या नावाने जमीन खरेदी करुन दोन मजली घर बांधले होते. सध्या ती चार मुलांसह येथे राहात होती.

चार वर्षांपासून नियाझ भारतात आला नाही

नियाझ याने सौदीत एका महिलेशी निकाह केला आहे. तिच्या सोबत तो तेथे रहात आहे. नियाझ चार वर्षांपासून भारतातील त्याच्या या घरी आलेला नाही. त्याचे गाझियाशी भांडण झाले होते. एक वर्षांपूर्वी गाझिया तिच्या चारही मुलांना घेऊन सौदीला गेली होती. नंतर काही दिवसांनी ती भारतात आली. नंतर नियाझ याचा कॉल आल्यावर तो केवल मुलांशी बोलायचा. नियाझ याची आई अमीना,दोन भाऊ सलीम आणि मुबारक गावी राहातात. तर अन्य दोन भाऊ कलीम आणि करीम देखील सौदीत नोकरी करतात.

शनिवारी २ मे रोजी नियाझ याने पत्नी गाझियाच्या फोनवर अनेक कॉल केले. परंतू कॉल रिसीव्ह झाले नाहीत. त्यानंतर नियाझ याने एका ओळखीच्याला कॉल करुन मुलांच्या शाळेतून माहिती काढण्यास सांगितले. मात्र, मुले शाळेत गेलीच नसल्याचे त्याला कळाले.

शनिवारी सकाळी सात वाजता दुधवाल्याने देखील दूध देण्यासाठी अनेकदा दार वाजवले पण आतून कोणी दरवाजा उघडला नाही.काही वेळानंतर तो तसाच परतला. दुपारपर्यंत मुलांशी बोलणे न झाल्याने नियाझने त्याच्या शहजादपूर येथे राहणाऱ्या एका नातेवाईकांना गाझिया आणि मुलांचा शोध घेण्यास सांगितले.कुठेही काही पत्ता न लागल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. दुपारी तीन वाजता पोलिसांनी दरवाजा तोडला तर आता नजरा थरकाप उडवणारा होता.

पोलिसांनी सांगितले की घराच्या भिंतीपासून बिछान्यापर्यंत सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडाले होते. मुलांच्या उलटी करण्याच्या खुणाही होत्या. पोलिसांना संशय आहे की मुलांची हत्या करण्याआधी त्यांच्या जेवणात विषारी पदार्थ टाकला असावा. त्यानंतर मुलांच्या डोक्यात विटा, हातोट्यांनी वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. आणि त्यांची आई गॅलरीतून उडी मारुन पळून गेल्याचा संशय आहे. गाझिया हीच्या शोधासाठी  पोलिसांच्या सहा टीम तिच्या मागावर आहेत. या महिलेचे प्रेमप्रकरण आणि पतीशी सुरु असलेला वाद अशा सर्व एंगलने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Follow Us