BBC च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाची धाड
बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून कार्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई : BBC च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून याबाबत अजून कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या लंडनमधील कार्यालयाला याची माहिती देण्यात आलेली आहे.
मुंबई आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेली आयकर टीम दिल्लीची आहे. सध्या आयकर पथकाने बीबीसी कार्यालयात शोध सुरू केला आहे. बीबीसी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नाही.
सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी IT ची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे. विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

