
भारताने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. भारताने वीज उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के ग्रीन एनर्जी स्त्रोतांपासून मिळवण्याचं लक्ष्य पाच वर्षाच्या आतच पूर्ण केलं आहे. म्हणजे मुदतीच्या आत भारताने ही कामगिरी केली आहे. भारताने 2030 पर्यंत हे लक्ष्य ठेवलं होतं. एकूण 484.8 गीगावॅट (एक गीगावॅट म्हणजे 1,000 मेगावॅट) स्थापित क्षमतेपैकी 242.8 गीगावॅट गैर-जीवाश्म म्हणजेच स्वच्छ ऊर्जा स्रोतांमधून मिळवले गेले आहेत, अशी माहितीही प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशात स्वच्छ इंधनावर आधारीत वीज उत्पादन वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिबद्धतेला पाहता अत्यंत महत्त्वाची ही कामगिरी आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गीगावॅट नवनीकरणीय वीज उत्पादनाची क्षमतेचं महत्त्वकांक्षी लक्ष्य ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात एक प्रमुख हवामान वचनबद्धता पूर्ण झाली आहे. भारताची एकूण वीज क्षमता आता 484.8 गीगावाट आहे. यात 242.8 गीगावाट गैर-जीवाश्म ईंधन (स्वच्छ इंधन) स्रोतोंमधून येत आहे. आपल्या हरित प्रगतीचं ते एक शक्तीशाली प्रमाण आहे, असं जोशी यांनी म्हटलं आहे.
In a world seeking climate solutions, India is showing the way.
Achieving 50% non-fossil fuel capacity five years ahead of the 2030 target is a proud moment for every Indian.
Hon’ble PM Shri @narendramodi ji’s leadership continues to drive Bharat’s green transformation — paving… pic.twitter.com/ydzWErWQNC
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) July 14, 2025
हा केवळ एक मैलाचा दगड नाहीये, तर 2047 पर्यंत एक हरित, स्वच्छ भारताच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. भारतासाठी ऐतिहासिक हरित उडी आहे, असंही जोशी यांनी ट्विटमधून स्पष्ट केलं. भारताने वीज उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के ग्रीन एनर्जी स्त्रोतांपासून मिळवण्याचं लक्ष्य गाठलं आहे. पाच वर्षाची यासाठी मुदत होती. पण भारताने हे लक्ष्य 2030च्या आधीच गाठलं आहे. ग्रीन एनर्जी क्षमतेचा पल्ला गाठणं ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मोदींच्या नेतृत्वात देशात हरित बदलाला गती मिळत आहे. त्यामुळे एक आत्मनिर्भर आणि टिकाऊ भविष्याचा मार्ग प्रशस्त होताना दिसत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
ग्रीन एनर्जीलाच हरित ऊर्जा वा स्वच्छ ऊर्जाही म्हटलं जातं. सूर्य, हवा, पाणी आणि पृथ्वीच्या उष्णतेतून ही ऊर्जा उत्पन्न केली जाते. थोडक्यात नैसर्गित स्त्रोतातून ही ऊर्जा संपादित केली जाते. ही ऊर्जा पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे कोळसा किंवा पेट्रोलियम पदार्थांपासून निर्माण केली जात नाही. पारंपारिक पद्धतीची ऊर्जा ही पर्यावरणाला हानिकारक आहे. त्यातून ग्रीनहाऊस गॅसचं उत्सर्जन कमी होतं, त्यामुळे ही ऊर्जा परवडणारी नसते.