India AI Impact Summit 2026 : नवीन टेक्नोलॉजी AI कडे भारत कसा पाहतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

"जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक AI Impact Summit मध्ये आपल्या सर्वांच हार्दिक अभिनंदन. ही परिषद ज्या भारतात होत आहे, तो भारत वन सिक्स ऑफ ह्यूमॅनिटीला रिप्रेजेंट करतो"

India AI Impact Summit 2026 : नवीन टेक्नोलॉजी AI कडे भारत कसा पाहतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात...
Narendra Modi
| Updated on: Feb 19, 2026 | 12:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत भारत मंडपम येथे 19 फेब्रुवारीला इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चं उद्घाटन केलं. यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो, ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डि सिल्वा, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेससह अन्य देशांचे प्रमुख आणि उद्योग जगतातील दिग्गज सहभागी झालेले. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी टेक्नोलॉजी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलं. येणाऱ्या पिढ्यांना आपण AI मधून काय देणार आहोत? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं अश्विनी वैष्णव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिटला संबोधित केलं. “AI आता मानवी इतिहासाचं परिवर्तन घडवेल. भारताने नेहमीच नवीन टेक्नोलॉजी ग्रहण केलीय. सोबतच नवीन टेक्नोलॉजी मजबूत बनवायला मदत केली आहे” असं पीएम मोदी म्हणाले.

“जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक AI Impact Summit मध्ये आपल्या सर्वांच हार्दिक अभिनंदन. ही परिषद ज्या भारतात होत आहे, तो भारत वन सिक्स ऑफ ह्यूमॅनिटीला रिप्रेजेंट करतो. भारत जगातील सर्वात मोठा युवा लोकसंख्या असलेला देश आहे. भारत सर्वात मोठं टॅलेंट पूलचं केंद्र आहे. सर्वात मोठ्या टेक इनेबल इकोसिस्टमच उदहारण आहे” असं पीएम मोदी यांनी सांगितलं.

माणूस फक्त रॉ मटेरियल पर्यंत मर्यादीत राहू नये

“भारत AI ला कुठल्या दृष्टीने पाहतो. त्याचं स्पष्ट प्रतिबिंब या समिटच्या थीममध्ये आहे. ‘सर्वजन हिताय – सर्वजन सुखाय’ हेच आमचं बेंचमार्क आहे. AI साठी माणूस फक्त डाटा पॉइंट बनू नये. माणूस फक्त रॉ मटेरियल पर्यंत मर्यादीत राहू नये. त्यासाठी AI ला democratized करावं लागेल. AI ला समावेशकता आणि सबळीकरणाचं माध्यम बनवावं लागेल” असं पीएम मोदी म्हणाले.

AI समिट एग्जिबिशनबद्दल प्रचंड उत्साह

“काही लोकांना नव्या टेक्नोलॉजीवर संशय आहे. पण ज्या पद्धतीने युवा पिढी AI ला स्वीकारत आहे, ते यापूर्वी कधीही दिसलेलं नाही. AI समिट एग्जिबिशनबद्दल प्रचंड उत्साह दिसून येतोय. जगातील 100 पेक्षा जास्त देशांचं प्रतिनिधीत्व, जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे दिग्गज या समिटीच्या यशाला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. यात युवा पिढीची जी उपस्थिती दिसलीय, ती नवीन विश्वास निर्माण करते” असं पीएम मोदी म्हणाले.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस इतिहासातील असाच एक बदल

“मानवी इतिहासात काही अशी वळणं आली, ज्याने पूर्ण शतक बदलून टाकलं. सभ्यतेची दिशा ठरवली आणि विकासाचा वेग बदलला. आर्टिफिशियल इंटेलिजेंस इतिहासातील असाच एक बदल आहे. AI मशीन्सना हुशार बनवत आहे. त्याशिवाय मानवी क्षमता अनेक पट वाढवत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.