AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनीता विल्यम्सला अंतराळातून भारत सुरक्षित आणणार का? इस्त्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले, सध्या…

isro s somanath: दुर्देवाने आम्ही त्यांची यावेळी कोणतीही मदत करु शकत नाही. आमच्याकडे त्यांना वाचवण्यासाठी यान पाठवण्याची कोणतीही क्षमता नाही. अमेरिका किंवा रशियाच या संकटातून त्या दोघं अंतराळवीरांना सोडवू शकतात.

सुनीता विल्यम्सला अंतराळातून भारत सुरक्षित आणणार का? इस्त्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले, सध्या...
Sunita Williams and s somanath
| Updated on: Aug 24, 2024 | 6:17 PM
Share

Sunita Williams : भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडली आहे. तिच्यासोबत बुच विल्मोर देखील अंतराळ स्थानकामध्ये अडकलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन अंतराळ संस्था (नासा) त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु नासाला अजूनही यश आले नाही. यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनीता विल्यम्स 5 जून रोजी अंतराळ स्थानकात गेली होती. परंतु स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते पृथ्वीवर अजूनही परत येऊ शकले नाही. दरम्यान, भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) चे प्रमुख एस.सोमनाथ यांनी यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. सुनीता विल्यम्सला भारतात आणण्यासाठी इस्त्रो मदत करणार का? त्यावर सोमनाथ यांनी अमेरिका आणि रशियाच मदत करु शकणार असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिका, रशियाच सोडणार प्रश्न

यूट्यूब पॉडकास्ट बीयरबाइसेप्ससोबत बोलताना इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, ‘दुर्देवाने आम्ही त्यांची यावेळी कोणतीही मदत करु शकत नाही. आमच्याकडे त्यांना वाचवण्यासाठी यान पाठवण्याची कोणतीही क्षमता नाही. अमेरिका किंवा रशियाच या संकटातून त्या दोघं अंतराळवीरांना सोडवू शकतात. कारण अमेरिकेकडे क्रू ड्रॅगन वाहन आहे. रशियाकडे सोयुज आहे. दोघांचा वापर बचाव अभियानासाठी करता येणार आहे.’

परिस्थिती अजूनही नियंत्रणात

इस्त्रो प्रमुखांना दोन्ही अंतराळवीर अंतराळात फसले आहे का? असे विचारले असता सोमनाथ यांनी सांगितले की, मला असे वाटत नाही. परिस्थिती खूप गंभीर झाली आहे, असेही नाही. फक्त स्टारलाइनरमध्ये काही असामान्य आढळून आले आहे, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तसेच लॉन्च करण्याआधीसुद्धा स्टारलाइनरमध्ये अनेक समस्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला गेला होता. परंतु आता परतीच्या प्रवासात सावधगिरी बाळगली जात आहे.

नासाच्या बैठकीत होणार निर्णय

नासामधील शास्त्रज्ञांची आता बैठक होणार आहे. नासा प्रशासक बिल नेल्सन आणि इतर अधिकारी या बैठकीत असणार आहे. त्यात पुढील नियोजन करण्यात येणार आहे. बोइंगचे नवीन कॅप्सूल अंतराळातून सुनीता विल्यम्स आणि तिच्या सहकाऱ्यांना आणू शकतो की नाही? त्यावर निर्णय होणार आहे.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.