AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada | राजकारणानंतर आता दोन्ही देशात इकोनॉमिक वॉर, जाणून घ्या कशावर होणार परिणाम?

India vs Canada | तोडगा निघण्याऐवजी भारत आणि कॅनडाधील वाद आणखी चिघळत चाललाय. शिक्षण क्षेत्राला या वादाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. कॅनडात शिक्षणाचा खर्च किती लाखाच्या घरात आहे?

India vs Canada | राजकारणानंतर आता दोन्ही देशात इकोनॉमिक वॉर, जाणून घ्या कशावर होणार परिणाम?
Justin Trudeau-pm modi
| Updated on: Sep 20, 2023 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामध्ये मागच्या काही वर्षांपासून संबंध बिघडत चालले होते. राजकीय लढाईनंतर दोन्ही देशात आता इकोनॉमिक वॉर सुरु झालय. ज्याचा परिणाम कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत होणार आहे. भारत आणि कॅनडामधील वादावर तोडगा निघाण्याऐवजी हा विषय अधिक चिघळत चाललाय. खलिस्तान्यांचा समर्थन करण्यावरुन सुरु झालेला हा वाद आता इकोनॉमीपर्यंत जाऊन पोहोचलाय. भारत आणि कॅनडामध्ये कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत अनेक अब्जाची गुंतवणूक आहे. सर्वाधिक परिणाम एज्युकेशन सेक्टरवर होऊ शकतो. भारतातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाला जातात. बिघडलेल्या राजकीय संबंधांचा सर्वाधिक परिणाम याच क्षेत्रावर होऊ शकतो. भारत-कॅनडात कुठल्या गोष्टींवर देवाण-घेवाण होते, भारतावर कितपत परिणाम होईल, जाणून घेऊया.

वर्ष 2022 मध्ये भारत कॅनडाचा 10 वा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर होता. 2022-23 आर्थिक वर्षात भारताने कॅनडाला 4.10 अब्ज डॉलरच्या सामानाची निर्यात केली. त्याचवर्षी कॅनडाने भारताला 4.05 अब्ज डॉलरच सामान निर्यात केलं. दोन्ही देशातील व्यापार बरोबरीचा आहे. याआधी 2021-22 मध्ये भारताने कॅनडाला 3.76 अब्ज डॉलरची निर्यात केली. तेच 2021-22 मध्ये आयातीचा आकडा 3.13 अब्ज डॉलर आहे. दोन्ही देशात 2021-22 मध्ये द्विपक्षीय व्यापार सात अब्ज डॉलरचा होता. 2022-23 मध्ये त्यात वाढ होऊन हा व्यापार 8.16 अब्ज डॉलरचा झाला. एका विद्यार्थ्याच्या Fee चा खर्च किती लाख?

भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मोठी पसंती कॅनडाला आहे. कॅनडामध्ये 40 टक्के परदेशी विद्यार्थी आहेत. कॅनडा आणि भारताच्या संबंधात तणाव सतत वाढत चालला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी कॅनडामध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. पंजाबमधून बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाला जातात. कॅनडामध्ये सध्या पंजाबचे दोन लाख विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. एका विद्यार्थ्याच्या फी चा 25 लाख रुपये खर्च होतो. तणाव आणखी वाढल्यास कॅनडा आपल्या देशातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करेल. पण त्यामुळे त्यांना फी च्या रक्केमवर पाणी सोडावं लागेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.