India US Tariff War : भारताकडे सुद्धा अमेरिकेला धक्क्याला लावायचा प्लान रेडी, पहिला वार असा असेल, आधी एकादेशाला धडा शिकवून झालाय
India US Tariff War : मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी निर्णयांचा सपाटा लावला आहे. सतत ते भारताला घायाळ करत आहेत. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, आपण काही करणार की नाही?. भारताकडे सुद्धा अमेरिकेला धक्क्याला लावण्याचा प्लान आहे. तो कसा असेल? या बद्दल जाणून घ्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय सामानावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारतात अमेरिकी ब्रांड्स विरोधात राग आणि नाराजी वाढत चालली आहे. आधी भारताने चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवलेला. आता भारताने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केलीय. मागच्या काही दशकात भारताने आपली आर्थिक ताकद वाढवली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत देशातंर्गत उत्पादनाला चालना देण्याचा संकल्प ठेवला आहे. भारतीय बाजारात देशांतर्गत उत्पादनाचा हिस्सा वाढावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न आहे.
अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारतात मेड इन इंडियाला समर्थन देण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. व्यापारी आणि सर्वसामान्य लोक परदेशी ब्रांड्सचा बहिष्कार करुन देशातील वस्तुंना प्राधान्य देण्याबद्दल बोलू लागले आहेत. सोशल मीडियापासून रस्त्यापर्यंत मेड इन इंडियाला समर्थन वाढत चाललं आहे.
आपली रणनिती काय?
भारत अमेरिकी कंपन्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा बाजार आहे. इथला वाढता मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्गाला आंतरराष्ट्रीय ब्रांड्सच आकर्षण आहे. मॅकडोनाल्ड्स, कोका-कोला, अमेजॉन, एप्पल ही नाव आज भारतीयांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत. व्हॉट्सएपचा सर्वात मोठा युजर बेसही भारतात आहे. डोमिनोजचे सर्वात जास्त रेस्टॉरेंट इथेच आहेत. भारतात अमेरिकी ब्रांड्सचा बहिष्कार वाढला, तर या कंपन्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
दक्षिण कोरियाचं उदहारण काय?
आता व्यावसायिकांचा आवाजही मेड इन इंडिया समर्थनाला साथ देत आहे. वाओ स्किन साइंसचे को-फाउंडर मनीष चौधरी यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये शेतकरी आणि स्टार्टअप्सची हिम्मत वाढवताना सांगितलं की, “मेड इन इंडियाला सगळ्या जगात लोकप्रिय करण्याची वेळ आली आहे. ज्या प्रकारे दक्षिण कोरियाच्या फूट आणि ब्यूटी प्रोडक्ट्सनी जगभरात नाव कमावलं, तशीच भारतीय ब्रांड्सनी आपली वेगळी ओळख बनवली पाहिजे”
ड्राइवयूचे सीईओ काय म्हणाले?
“भारताने चीनप्रमाणे स्वत:चे सोशल मीडिया आणि टेक प्लॅटफॉर्म तयार केले पाहिजेत. जेणेकरुन ट्विटर, गुगल, यूट्यूब आणि व्हाट्सऐप सारख्या परदेशी सेवांवरील आपलं अवलंबित्म कमी होईल” असं ड्राइवयूचे सीईओ रहम शास्त्री यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
नरेंद्र मोदी काय बोलले?
बंगळुरुत एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही कंपनीच नाव न घेता म्हणाले की, “भारतीय टेक कंपन्या जगासाठी प्रोडक्ट बनवतात. पण आता देशाच्या गरजांना प्राथमिकता देण्याची वेळ आली आहे” मोदींच हे वक्तव्य आत्मनिर्भर भारताचा संदेश अजून मजबूत करतं.
