भारत उद्योग, व्यापार, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी पाऊल पुढे टाकत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने मोठ्या ताकदीने आपली वाटचाल सुरू केली आहे. आता 2025 हे साल सरत आले आहे. हे वर्ष भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वापूर्ण ठरले आहे. सध्याचे तंत्रज्ञान, भविष्यात या तंत्रात होणारा बदल लक्षात घेऊन भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. आजघडीला भारत अंतराळ संशोधण, अणुउजा, कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर्स, महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. विशेष म्हणजे ही प्रगती फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही तर भारताची ही प्रगती आता जगासाठी दिशादर्शक आणि या क्षेत्राला नवा आकार देणारी ठरत आहे.
भविष्याचा वेध घेत भारताने एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. इंडिया एआय मिशन अंतर्गत भारत सरकारने या क्षेत्रात साधारण 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य समोर ठेवलेले आहे. मानव केंद्री आणि नैतिकतेला केंद्रस्थानी ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात विकास आणि विस्तार व्हावा, असा भारताचा उद्देश आहे.
भारताने सेमी कंडक्टर क्षेत्रातही मोठी प्रगती करतो आहे. आपल्या तंत्रज्ञान मोहिमेमध्ये भारताने सेमीकंडक्टरच्या निर्मितीला केंद्रस्थानी ठेवलेले आहे. याचाच एक भाग म्हणून भारताने दोन महत्त्वाचे पावलं उचललेले आहेत. मे 2025 मध्ये नोएडा आणि बंगळुरू येथे 3-नॅनोमीटर चीप डिझाईन तयार करण्यासाठी दोन प्रगत केंद्रांची सुरूवात केलेली आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
सेमीकंडक्टर्सची निर्मिती करण्यासाठी दुर्मिळ खनिजांची (रेअर अर्थ मिनरल्स) फार मोठी गरज असते. ही दुर्मिळ खनिजे नसतील तर एआय, अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रगती करणे अशक्य आहे. त्यामुळेच मोदी सरकारने जानेवारी 2025 रोजी नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशनची सुरुवात केली. या मिशनअंतर्गत सरकारने सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी या क्षेत्रात स्वावलंबनासाठी 16300 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. दरम्यान, आगामी वर्षदेखील भारत या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पावलं टाकणार आहे.