AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राफेल, INS विक्रांत, आकाश, S400, शिल्का, स्कॅल्प क्षेपणास्त्र, L70… भारतीय लष्कराचे ठरले हिरो, पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले

India Pakistan Tension: पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवर स्वार्म ड्रोन पाठवले. परंतु भारताच्या एल-70 ने ते निकामी केले. भारतातील हवाई दलाकडून L-70 चा वापर केला जातो. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ही प्रणाली अपग्रेड केली आहे.

राफेल, INS विक्रांत, आकाश, S400, शिल्का, स्कॅल्प क्षेपणास्त्र, L70... भारतीय लष्कराचे ठरले हिरो, पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले
Zsu 23 ShilkaImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 09, 2025 | 8:43 AM
Share

India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. भारताच्या जबरदस्त प्रहारमुळे पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याच्या प्रयत्न झाला. परंतु भारतीय लष्कराच्या हिरोंमुळे पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी झाला. INS विक्रांत, आकाश, S400, शिल्का, L70 हे भारताचे आतापर्यंतच्या सर्व कारवाईचे हिरो ठरले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने या शस्त्रांचा वापर करुन पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे.

स्कॅल्प क्षेपणास्त्र

भारताने एअर स्ट्राईकमध्ये स्कॅल्प क्षेपणास्त्राचा वापर केला. हवेतून हे क्षेपणास्त्र डागले जाते. शत्रूला चकवा देण्यात या क्षेपणास्त्रांची ओळख आहे. रात्री आणि सर्व प्रकारच्या वातावरणात या क्षेपणास्त्रांचा वापर शक्य करता येतो. या क्षेपणास्त्रांचा पल्ला ३०० किलोमीटर आहे.

राफेल विमाने

भारताने फ्रान्सकडून घेतलेली राफेल विमाने बहुउद्देशीय आहे. फ्रान्सकडून 36 राफेल भारताने घेतले आहे. प्रथमच त्याचा वापर करण्यात आला. हवाई सुरक्षा, टेहळणी, जमिनीवर अचूक हल्ला, जहाजविरोधी हल्ला, अणुहल्ला करण्याचीही या विमानांची क्षमता आहे. एकाच वेळी हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवरही ही विमाने मारा करू शकतात.

एल-70

पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवर स्वार्म ड्रोन पाठवले. परंतु भारताच्या एल-70 ने ते निकामी केले. भारतातील हवाई दलाकडून L-70 चा वापर केला जातो. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ही प्रणाली अपग्रेड केली आहे. कमी उंचीवर उडणाऱ्या हवाई लक्ष्यांविरुद्ध हे प्रभावी आहे. ते कोणत्याही हवामानात दिवसरात्र काम करते.

एस-400

भारत-पाकिस्तान सीमेवर S-400 ने पाकिस्तानचे सर्व क्षेपणास्त्र निकामी केले. पाकिस्तानने जम्मूमधील हवाई तळावर क्षेपणास्त्र डागले होते. परंतु भारताच्या शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला गेला. भारताने पाकिस्तानचे 8 क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली.

INS विक्रांत

भारताच्या आयएनएस विक्रांतने आपली कामगिरी फक्ते केली. INS विक्रांतने समुद्रात आपली ताकद दाखवली. नौदलाने आयएनएस विक्रांतला आधीच अरबी समुद्रात तैनात केले होते. त्याच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये विमानवाहू जहाजे, विध्वंसक, फ्रिगेट्स, पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि इतर सहाय्यक जहाजे समाविष्ट आहेत.

ZSU-23-4 शिल्का

‘शिल्का’ या रशियन टोपणनावाने ओळखली जाणारी ZSU-23-4 ही स्वयंचलित प्रणाली आहे. ही प्रणाली 20 किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य शोधण्यास सक्षम आहे. प्रति मिनट 4,000 राउंड फायर यामधून केले जाते. अलीकडेच त्यात प्रॉक्सिमिटी-फ्यूज दारूगोळा आणि लहान ड्रोनशी सामना करण्यासाठी प्रगत अग्नी-नियंत्रण प्रणालींचा समावेश केला आहे.

आकाश क्षेपणास्त्र प्रणाली

7-8 मे च्या रात्री पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड आणि इतर 15 शहरांमधील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने श्रीनगरकडे जाणारे पाकिस्तानी JF-17 जेट विमान पाडले. या क्षेपणास्त्राने ड्रोन नष्ट केले. हवेतून हवेत मारा करणारी हे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.