India-Madive Row : तर आम्ही उद्ध्वस्त होऊ, अखेर मालदीवने गुडघे टेकले

मालदीवने भारतासोबत पंगा घेतल्यानंतर आता त्यांना त्याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. मालदीवची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. त्यातच भारतीयांना मालदीववर बहिष्कार टाकल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

India-Madive Row : तर आम्ही उद्ध्वस्त होऊ, अखेर मालदीवने गुडघे टेकले
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 6:20 PM

भारताशी पंगा घेणे मालदीवला किती महागात पडलंय हे आता त्यांना कळून चुकलंय. मालदीव सरकारने भारतीय पर्यटकांना त्यांच्या देशात येण्याचे आवाहन केले आहे. मालदीवच्या मंत्र्याने म्हटले की, भारताने आपली नाराजी संपवली नाही तर आपण उद्ध्वस्त होऊ. अखेर मालदीवने भारतापुढे गुडघे टेकले आहेत आणि आता भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे. भारतीय पर्यटकांसाठी लवकरच विशेष सेवा सुरू करणार असल्याचे मालदीवच्या मंत्र्यांनी सांगितले आहे.

मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद म्हणाले की, आम्ही आमच्या देशात भारताची RuPay सेवा सुरू करण्याची तयारी करत आहोत. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर मालदीवमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांना रुपयात पैसे खर्च करता येणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप ठरलेली नसून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय होऊ शकतो.

रुपे सेवा म्हणजे काय?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने RuPay सेवा सुरू केली आहे. हे पहिले भारतीय उत्पादन आहे, जे जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्कशी जोडलेले आहे. आतापर्यंत अनेक देशांनी हे स्वीकारले आहे. एटीएम व्यतिरिक्त, रुपे कार्ड पीओएस मशीन आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील वापरले जाऊ शकतात.

मालदीवचा हेतू काय आहे?

रुपेमुळे आमचे चलनही मजबूत होईल, असे मालदीवचे मंत्री म्हणाले आहेत. जगभरात डॉलरवरुन अनेक चढउतार पाहायला मिळतात. यामुळे इतर देशाच्या चलनाला मोठा फटका बसतो. भारतासारख्या देशासोबत स्थानिक चलनात व्यापार केल्यास मालदीवला देखील आर्थिक बळ मिळेल. ऑगस्ट 2022 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलेह यांनी मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरू करण्यासाठी भारतासोबत चर्चा सुरु केली होती. यामुशे द्विपक्षीय पर्यटन आणि व्यापार वाढण्यास देखील मदत होईल.

मालदीवचे म्हणणे आहे की, भारत आणि चीन या दोन्ही देशांनी त्यांच्या स्थानिक चलनात व्यापार करण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे मालदीवला डॉलरऐवजी त्यांच्या स्थानिक चलनात व्यापार करता येणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील 1.5 दशलक्ष डॉलर्सच्या आयात बिलावर 50 टक्क्यांपर्यंत बचत होण्यास मदत होईल. याचा अर्थ मालदीव भारतासोबत रुपयात व्यापार करून सुमारे 7.5 लाख डॉलर्सची बचत करू शकेल. भारताने जुलै 2023 मध्येच सांगितले होते की या 22 देशांमध्ये मालदीवचाही समावेश आहे, जे आमच्यासोबत स्थानिक चलनात व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.