ताशी 75 किमी वेगाने सोसाट्याचे वारे, 21 राज्यात हवामान विभागाचा अलर्ट, पावसासह थेट..
राज्यात पावसाने पाठ फिरवली. परतीचाही पाऊस म्हणावा तसा झाला नाही. कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. देशात पुढील काही दिवस पाऊस असणार आहे.

देशात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच परतीचा पाऊस काही भागात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. उद्या काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशपर्यंतच्या क्षेत्रांत पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अनेक राज्यांत पावसासह वादळ होण्याची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 40 ते 60 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दक्षिण भारतातील ‘गल्फ ऑफ मन्नार’ (मन्नारचे आखात) जवळ तयार होत असलेल्या हवामान प्रणालीकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे; या प्रणालीच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाची हजेरी आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील गल्फ ऑफ मन्नार परिसरात तयार होत असलेल्या हवामान प्रणालीवरही लक्ष ठेवले जात आहे. याचा परिणाम तामिळनाडू आणि आसपासच्या भागांत पाऊस व जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. कारण उष्णता वाढत असतानाच हा अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल.
काही भागांत पावसामुळे तापमान कमी होऊ शकत असले, तरी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे अडचणी वाढू शकतात. पाटणा, गया आणि भागलपूरपासून ते उत्तर प्रदेशातील मेरठ, आग्रा आणि गाझियाबादपर्यंतच्या क्षेत्रांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
ईशान्य भारतात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात 11-12 आणि 15-16 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयमध्ये 11-12 ऑक्टोबर आणि 13 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत पाऊस पडू शकतो. गुवाहाटी, शिलाँग आणि आसपासच्या परिसरातील हवामानात तफावत असू शकते. महाराष्ट्रात स्थिती गंभीर आहे. कोरडा दुष्काळ पडला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे.