AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान युद्धविराम, राजकीय आणि सर्वसामान्यांच्या वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रीया..

पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्यासाठी हे युद्ध थांबायला नको होतं असे म्हटले आहे. तर काहींनी पाकिस्तानला या युद्धामुळे चांगला धडा मिळाला आहे. त्यामुळे युद्ध थांबलं ते बरं झालं अशा समिश्र प्रतिक्रिया जनसामान्यांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत-पाकिस्तान युद्धविराम, राजकीय आणि सर्वसामान्यांच्या वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रीया..
| Updated on: May 10, 2025 | 8:56 PM
Share

पहलगामवरील अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले होते. पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यात हात असल्याचे पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानने भारतावरच उलट टीका केली. त्यामुळे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्याआधी भारताने स्ट्रेटॅजिक निर्णय घेत पाकिस्तानला तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला. सिंधु जल वाटप करारच रद्द करुन टाकत पाकिस्तानचे पुरते वांदे केले होते. पाकिस्तानने सिंधु जल वाटप करार रद्द करणे हे युद्धाचे पाऊल समजले जाईल असा इशारा दिला. त्यानंतर काल पाकिस्तानने ४०० ड्रोनद्वारे भारतातील सीमेलगतच्या गावांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिथरलेल्या पाक सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला. त्यानंतर अचानक आज सायंकाळी युद्धविराम जाहीर केला. यावर आता राजकीय वतृळातून विविध नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्रधारी दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले असताना अचानक शनिवारी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्यात समेट घडविण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यश आले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भारत आणि पाकिस्तान युद्धविरामावर एक प्रतिक्रीया आलेली आहे. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,’भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही.‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता.ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.

पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे.शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद! पुणे

अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

बाबा महाकांल यांच्या दर्शनासाठी येथे उज्जैन येथे दर्शनाला आलो आहे. बाबा महाकाल यांच्यामुळे नवीन ऊर्जा मिळत असते. खरे तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र नदी जल करारासाठी मी मुख्यमंत्री मनोज यादव यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यादरम्यान मी बाबा महाकांल यांच्या दर्शनाला आला आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जेने यशाची शिखरे गाठत आहे. भारत आणि पाकस्तान युद्धविरामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता नाही. त्यांनी हा विषय मला माहीती नाही. मी प्रवासात होतो. या विषयाची नीट माहीती घेऊन मी प्रतिक्रीया देईन असे सांगितले.

सर्वसामान्य पुणेकर काय म्हणत आहेत ?

भारत पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम सामान्य पुणेकरांना काय वाटतं याचा धाडोंळा घेतला असता संमिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने युद्ध सुरूच ठेवायला पाहिजे होतं असे बहुतांशी पुणेकरांनी म्हटले आहे.आमच्या आया बहिणीचा सिंदूर पुसणाऱ्या पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्याची हीच वेळ होती असे यावेळी पुणेकरांनी म्हटले आहे.

भारत पाकिस्तानच्या सीमेवर सुरू असणाऱ्या सर्व हालचालीकडे लक्ष असणाऱ्या पुण्यातील जनसामान्यांनी पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्यासाठी हे युद्ध थांबायला नको होतं असेही अनेक पुणेकरांनी म्हटले आहे. तर काही नागरिकांनी पाकिस्तानला या युद्धामुळे चांगला धडा मिळाला आहे. त्यामुळे आता युद्ध थांबलं पाहिजे अशी समिश्र प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.