AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविरामाआधी काय घडामोडी घडल्या,पाहा…

भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमल्यानंतर शनिवारी अचानक मोठ्या घडामोडी घडल्या आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारताच्या डीजीएमओ यांच्याशी बोलणी झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी दोन्ही बाजूंनी युद्धविराम जाहीर केला गेला आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविरामाआधी काय घडामोडी घडल्या,पाहा...
| Updated on: May 10, 2025 | 8:18 PM
Share

भारत आणि पाकिस्तानात गेले १५ दिवस युद्धजन्य वातावरण सुरु आहे. २२ एप्रिल रोजी पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने ९ ठिकाणी राफेलद्वारे क्षेपणास्र डागले होते. भारताने स्ट्रॅटेजिक पावले उचलून सिंधू नदी करार रद्द करीत पाणी अडवणे, व्हीसा रद्द करणे, अटारी बॉर्डर बंद केल्या. शनिवारी अचानक मोठ्या घडामोडी घडल्या आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारताच्या डीजीएमओ यांच्याशी बोलणी झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी दोन्ही बाजूंनी युद्धविराम जाहीर केला गेला आहे.

भारत आणि पाकिस्तान या अण्वस्रधारी देशात पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाकल्याचे जाहीर केले. भारताने ७ मे रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानने देखील पूंछ, जम्मू, राजस्थान, गुजरात येथे ड्रोनने हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोन्ही देश युद्धाच्या अगदी नजिक पोहचले. मात्र शनिवारी अमेरिकेने मध्यस्थी केली. दोन्ही देशांच्या डीडीएमओनी सायंकाळी ५ वाजल्यानंतर युद्धविराम करण्याचे कबुल केले.भारताने आपल्या अटीवर दोन्ही देशांत सहमती होऊन युद्धविराम झाल्याचे जाहीर करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या डीजीएमओशी बोलणी झाल्यानंतर दोन्ही देशात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जम्मूसह ९ शहरातील विमानतळ बंद करण्यात आले होते. ती विमानांची प्रवासी वाहतूक आता सुरळीत सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय घडल्या घडामोडी पहा

* – दुपारी ३.३५ वाजता पाकच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना फोन

* – ५ वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून घोषणा

* – दोन्ही बाजूच्या डीजीएमओंचा फोनवरुन युद्धविरामासंदर्भात संवाद

* – १२ मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा चर्चा करणार

* – भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....