इस्रायलची एन्ट्री… पाकिस्तान थरथर कापला; भारताच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानला चीनने शस्त्रे दिली असताना, इस्रायलने भारताला अत्याधुनिक शस्त्रे पाठवली आहेत. यामुळे सैन्य तणाव वाढण्याची शक्यता आहे. 15 इस्रायली नागरिक श्रीनगरला पोहोचल्याचीही माहिती आहे, ज्यामुळे संयुक्त ऑपरेशनची शक्यता वर्तवली जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. आधी या प्रकरणात रक्ताचे पाट वाहण्याची भाषा बोलणारा पाकिस्तान आता बॅकफूटवर आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे काही देशांनी या प्रकरणात एन्ट्री घेण्यास सुरुवात केली आहे. चीनने पाकिस्तानला PL-15 लाँग Range Air-to-Air Missile दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान खूश होता. पण या प्रकरणात इस्रायलने एन्ट्री घेऊन भारताची बाजू घेताच पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. इस्रायलने भारताला विशेष हत्यारे पाठवली आहेत. त्यामुळे सैन्य तणाव वाढण्याची शक्यता वाढली आहे. अचूक निशाणा लावणाऱ्या बॉम्बनी सज्ज एक विमान भारताच्या आदमपूर एअरबेसवर उतरलं आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: भारत खरोखर पाकिस्तानात वाहणाऱ्या सिंधू नदीचे पाणी थांबवू शकतो का?
इस्रायलवरून आलं विमान
हत्यारांनी सुसज्ज विमान भारतात आल्याच्या वृत्ताला भारत किंवा इस्रायलकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. सूत्रांनी मात्र ही पक्की खबर असल्याचं म्हटलं आहे. हे शस्त्र, अचूक निशाणा साधू शकणारी आहेत. युद्धभूमीवर त्याचा अत्यंत चांगला परिणाम होणार आहे. दोन अण्वस्त्रधारी देशातील वाढती दुश्मनी पाहता या हे शस्त्र अधिक उपयोगी ठरणारी आहेत. एक ट्विट व्हायरल होत आहे. त्यावर एक मजकूर लिहिण्यात आला आहे. “सर्वात मोठी बातमी : इस्रायलने भारताला काही शस्त्रे पाठवली आहेत. या हत्यारांनी भरलेलं विमान आज भारतात उतरलं आहे”, असं ट्विट करण्यात आलं आहे. पण या ट्विटची पुष्टी करण्यात येत नाहीये.
15 इस्रायली काश्मिरात
मिळालेल्या माहितीनुसार, 15 इस्रायली नागरिक काल रात्री श्रीनगरला पोहोचले आहेत. त्यावरून भारत आणि इस्रायल मिळून काश्मीरमध्ये एखादं मोठं ऑपरेशन करण्याचे संकेत मिळत आहेत. तथापी पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी यांनी इस्रायलाच इशारा दिला आहे. इस्रायलने भारत – पाकिस्तान तणावापासून दूर राहावं, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हल्ल्यानंतर तणाव
दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान 22 एप्रिलपासून तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांवर कारवाई करण्यासाठी इशारे देत आहेत. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे सर्वजण पर्यटक होते. अतिरेक्यांनी या सर्वांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची डेडलाईनही दिली आहे.