AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलप्रमाणेच भारतही पाकिस्तानवर पेजर हल्ला करू शकतो का ? रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?

पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तानला पेजर हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे. रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी यावर भाष्य करताना इस्रायलच्या उदाहरणाचा उल्लेख केला आहे. भारताकडून असा हल्ला करणे कठीण असले तरी, त्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेतल्याने भारताकडून हल्ल्याची भीती वाढल्याचे दिसून येते.

इस्रायलप्रमाणेच भारतही पाकिस्तानवर पेजर हल्ला करू शकतो का ? रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?
पेजर हल्ला
| Updated on: May 01, 2025 | 6:01 PM
Share

गेल्या मंगळवारी ( 22 एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यात 25 भारतीय आणि एका परदेशी नागरिकासह एकूण 26 जणांनी जीव गमावला. या हल्ल्यानंतर भारत प्रचंड संतापला असून दहशतवाद मूळापासून उखडण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला. या हल्ल्यातील काही दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचीही माहिती समोर आली असून पाकविरोधात आता भारताने कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू पाणी करार स्थगित करणे असो किंवा भारतातील पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवणे असो, भारताने आता अतिशय कठोर भूमिका घेतली असून पाकचे नाक दाबण्याचा प्रयत्न होत आहेत.

आपला दहशतवादाशी संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या पाकची आता भीतीने बोबडी वळालीआहे. दरम्यान याच पाकला आता लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ला होण्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना हा इशारा दिला आहे.24 तासांतून एकदा तरी मोबाईल फोन बंद करावेत, असे चौधरी म्हणालेत.भारत डिजीटल हल्ला करू शकतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

भारतही पाकिस्तानवर पेजर हल्ला करू शकतो का ?

याच मुद्यावरून टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधला. इस्रायलप्रमाणेच भारतही पाकिस्तानवर पेजर हल्ला करू शकतो का ? असा सवावल त्यांन विचारला असता, त्यांनी त्यावर सविस्तर उत्तर देत परिस्थिती समजावली.

पाकवर पेजर हल्ला होऊ शकतो. इस्रायलने अशा प्रकारे हल्ला हिजबुल्ला वर केला होता, ज्यात त्यांची 60 माणसं मेली होती आणि 400 च्या वर जखमी झाले होते. मात्र इस्रायलने जेव्हा कारवाई केली, त्याची तयारी त्यांनी दोन वर्षांपासून केली होती. त्यांनी त्या ठिकाणी सगळी तयारी करून ठेवली होती. पण भारत-पाकिस्तानबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडून पाकिस्तान काहीच घेत नाही. आपलं तैवान, साऊथ कोरिया किंवा चायना मध्ये आपला इंटरेस्ट असेल की, मॅन्युफॅक्चरिंग स्टेजमध्ये आपण काही गडबड करू शकतो. इस्रायलबाबात सांगायचं झालं तरजराइलने जेव्हा पेजरची शिपमेंट झाली त्यावेळेला तयारी केली होती. पण पाकिस्तानला होणारी कुठलीही शिपमेंट भारतात थांबत नाही, ते डायरेक्ट पाकिस्तानला जाते त्यामुळे शक्यता कमी आहे. पण पेजर हल्ल्याच्या पर्यायसुद्धा नाकारता येत नाही.

पाकिस्तान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवणार

नागरिकांना अलर्ट करण्यासाठी पाककडून आता सायरन बसवण्यात येणार आहे. हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी हा सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विचाराच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडलेली आहे. यावर कर्नल पटवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली.

जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा नेहमीच सायरन वाजवला जातो हे सायरन जनरली स्थानिक प्रशासन आपल्या परीने सगळीकडे लावतो. त्यामुळे लोकांना सूचना मिळू शकेल की कुठलातरी हल्ला सुरू आहे. हे कॅज्युअलटी कमी करण्यासाठी असतं, हे प्रत्येक लढाईच्या वेळी होत असतं. ज्या अर्थी पाकिस्तानने सायरन लावण्याचा निर्णय घेतला त्याअर्थी पाकिस्तानला भारत हल्ला करणार आहे हे कळलेलं आहे, याची खात्री झालेली आहे, असं ते म्हणाले.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.