AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध इराणमध्ये, फटका भारताला; पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार?

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले असून भारतात पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागण्याची भीती आहे. दर आठवड्याला होणाऱ्या संभाव्य दरवाढीबद्दल सविस्तर माहिती वाचा.

युद्ध इराणमध्ये, फटका भारताला; पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार?
petrol
| Updated on: May 11, 2026 | 9:53 AM
Share

पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे, या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतीय सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याचे संकेत पाहायला मिळत आहेत. जगभरातील कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या प्रचंड वाढीमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.

नेमकी परिस्थिती काय?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यामुळे भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाला दरमहा सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था हे मोठे नुकसान दीर्घकाळ सोसू शकणार नाही. त्यामुळे येत्या आठवड्यापासूनच इंधन दरवाढीची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर लिटरमागे आठवड्याला २ ते ३ रुपये याप्रमाणे ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे आवाहन

दरम्यान याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. सध्या पश्चिम आशियातील संकट पाहता पेट्रोलियम उत्पादनांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. आपण केवळ गरजेनुसारच इंधनाचा वापर केला पाहिजे. यामुळे परकीय चलनाची बचत होईलच, पण युद्धाचे आर्थिक दुष्परिणाम कमी करण्यासही मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तज्ज्ञांचे आणि नेत्यांचे मत

यावर पश्चिम बंगालचे नेते दिलीप घोष यांनी भाष्य केले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जागतिक संघर्षामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी परिस्थिती संयमाने हाताळली असून आतापर्यंत किमती वाढू दिल्या नाहीत. मात्र, आता आपण संभाव्य बदलांसाठी तयार राहिले पाहिजे, असे दिलीप घोष म्हणाले.

सद्यस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांना दरमहा ५०,००० कोटींचा तोटा होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरात एकूण २५ रुपयांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण दर आठवड्याला पेट्रोल आणि डिझेलची किंमत २ ते ३ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?