AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Corona : देशात गेल्या 24 तासांत नव्या 11,739 रुग्णांची भर, 25 रुग्णांचा मृत्यू!

लसीकरणाची आकडेवारी पाहिली तर 197 कोटी 85 लाख 51 हजार 580 लोकांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 12 लाख 72 हजार 739 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. या कालावधीत 4 लाख 53 हजार 490 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, धोकादायक बाब म्हणजे काही लोकांचे दोन्ही कोरोना डोस झाल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झालीये.

India Corona : देशात गेल्या 24 तासांत नव्या 11,739 रुग्णांची भर, 25 रुग्णांचा मृत्यू!
कोरोना रुग्णवाढीची धास्तीImage Credit source: unsplash.com
| Updated on: Jun 26, 2022 | 10:58 AM
Share

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 11,739 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. कोरोनामुळे (Corona) आतापर्यंत देशात 5,24,999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी ही 4,33,89,973 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णावाढीनं डोकं वर काढल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. कालच्या तुलनेत आज कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. काल देशात 15,940 कोरोना रूग्णांची (Patients) नोंद करण्यात आली होती. तसेच 20 जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत आजचा आकडा दिलासादायक आहे.

24 तासात 11,739 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

लसीकरणाची आकडेवारी पाहिली तर 197 कोटी 85 लाख 51 हजार 580 लोकांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 12 लाख 72 हजार 739 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. या कालावधीत 4 लाख 53 हजार 490 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, धोकादायक बाब म्हणजे काही लोकांचे दोन्ही कोरोना डोस झाल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झालीये. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरायला हवे. कोरोना टाळण्यासाठी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

सातत्याने कोरोना रूग्णांच्या आकडा वाढतोय

गेल्या 24 तासांत भारतात 11,739 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीये. नवीन प्रकरणांमध्ये मागील दिवसाच्या 15,940 नवीन प्रकरणांपेक्षा घट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 92,576 आहे. मुंबईमध्ये देखील सातत्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. मुंबईसह ठाणे जिल्हातही आकडा वाढतोय. राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे मुंबई शहरामध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?