
Healthy Women, Healthy Families : भारत सरकारची निरोगी महिला, निरोगी कुटुंब ही योजनेला एक दो नाही तर तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले. आई निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी असे पंतप्रधान म्हणाले होते. त्या योजनेला जागतिक स्तरावर गौरवण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी दोन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आली आहे. त्यात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि महिलांना केंद्रस्थानी ठेऊन आरोग्यसेवा यावर जोर देण्यात आला आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली.
पोषण महिन्यानुसार, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत आयोजित या मोहिमेचे उद्दिष्ट महिला, किशोरवयीन मुली आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे, लवकर ओळख सुनिश्चित करणे आणि एक आरोग्यदायी भारतसाठी कुटुंबांना सक्षम, सशक्त करणे हा आहे. या मोहिमेतंर्गत सर्व जिल्ह्यात 19.7 लाखांहून अधिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये 11 कोटींहून अधिक लोकांनी त्यात भाग घेतला. जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि सेवाच्या भावनेतून प्रेरित होऊन, या योजनेत एक गौरवास्पद पाऊल टाकल्याचे म्हटले.
A Record-Breaking Milestone for Women’s Health! 🇮🇳
India achieves three GUINNESS WORLD RECORDS™️ titles under the nationwide #SwasthNariSashaktParivarAbhiyaan, reaffirming our commitment to preventive and women-centric healthcare.
Held from 17th Sept to 2nd Oct 2025 in… pic.twitter.com/Z9xiaupD8P
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) November 1, 2025
3 कोटींहून अधिक लोकांची नोंदणी
एक महिन्यात एखाद्या आरोग्य सेवा प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक 3.21 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. एक आठवड्यात सर्वाधिक 9.94 लाख लोकांनी ऑनलाईन स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी नोंदणी केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, ही मोहिम प्रत्येक जिल्ह्यात पोहचवला. येथे 19.7 लाख आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. विविध आरोग्य प्लॅटफॉर्मवर 11 कोटींहून अधिक लोकांनी या योजनेत सहभाग नोंदवला.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत ही मोहिम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेचे उद्दिष्ट महिला, किशोरवयीन मुली आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे, लवकर ओळख सुनिश्चित करणे आणि एक आरोग्यदायी भारतसाठी कुटुंबांना सक्षम, सशक्त करणे हा आहे. या योजनेचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. या योजनेताल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.