ट्रम्प यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतरही भारताचा मास्टरस्ट्रोक, युद्धविराम पण ‘या’ एका गोष्टीमुळे पाकिस्तानचा बीपी वाढला

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या अडचणी कायम राहणार आहेत.

ट्रम्प यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतरही भारताचा मास्टरस्ट्रोक, युद्धविराम पण या एका गोष्टीमुळे पाकिस्तानचा बीपी वाढला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 7:52 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशस्वी मध्यस्थिनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामाचा निर्णय घेतला आहे, युद्धविरामाचा निर्णय घेतल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांदी दोन्ही देशांचं अभिनंदन देखील केलं आहे.

दरम्यान युद्धविराम झाला असला तरी देखील पाकिस्तानच्या अडचणी मात्र संपलेल्या नाहीत. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली होती. भारतानं सर्वात आधी सिंधू नदी जल वाटप करार स्थगित केला होता, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आहे. तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान आज भारतानं जरी युद्धविरामाला संमती दिली असली तरी देखील सिंधू जल वाटप करारावरची स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे, त्यामुळे युद्धविरामानंतर देखील पाकिस्तानच्या अडचणी कायम राहणार आहेत. सिंधू नदी पाणी वाटप करारावरची स्थगिती उठवण्यात आली नसल्यानं  याचा मोठा फटका हा भविष्यात पाकिस्तानला बसू शकतो. दुसरीकडे वर्ल्ड बँकेनं देखील भारताच्या या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही अशी आपली भूमिका स्पष्ट करताना वर्ल्ड बँकेनं म्हटलं आहे.

दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरनतंर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता. पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, भारतानं हा हल्ला परतून लावला, प्रत्यु्त्तर म्हणून भारतानं देखील पाकिस्तानवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, अखेर त्यानंतर आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.