Kulgam Encounter : अतिरेक्यांचा मृत्यू अटळ, इंडियन आर्मीने पहिल्यांदाच रणांगणात उतरवलं ‘रूद्र’, या ब्रह्मास्त्रात असं काय खास?
Kulgam Encounter : कुलगाम एन्काऊंटरमध्ये सैन्याने अटॅक हेलिकॉप्टर रूद्रला उतरवलं आहे. याचा अर्थ आहे जमिनीवरच्या सैनिकांचा जीव धोक्यात न घालता दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर अचूक हल्ला. रुद्र रणांगणात उतरतो तेव्हा शत्रूकडे घाबरणं, पळणं आणि संपण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसतो.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांविरुद्ध एन्काऊंटर सुरु आहे. ही चकमक सुरु असताना सैन्याने अशी रणनिती वापरलीय, त्यामुळे दहशतवाद्यांचा मृत्यू अटळ आहे. इंडियन आर्मीने पहिल्यांदा दहशतवाद्यांविरुद्धच्या या ऑपरेशनमध्ये ‘रूद्र’ अटॅक हेलिकॉप्टरला उतरवलं आहे. पूर्ण सुसज्ज शस्त्र सज्जतेसह रुद्र या मिशनमध्ये सहभागी झाला आहे. 20mm ऑटोमॅटिक गनने सज्ज असलेला रुद्र दहशतवाद्यांच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. दहशतवाद्यांनी थोडीशी जरी हालचाल केली, तर थेट हल्ला होईल.
‘रूद्र’ एक साधारण हेलिकॉप्टर नाहीय. आकाशातून येणारं ते आगीच तुफान आहे. हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) ‘रूद्र’ हेलिकॉप्टर खास अशा मिशनसाठीच बनवलं आहे. सैन्याला टीप मिळालीय की, काही दहशतवादी या घनदाट जंगलात लपले आहेत. त्यांच्याकडून फायरिंग सुरु आहे. जमिनीवर सुरु झालेली ही लढाई आता आकाशापर्यंत पोहोचली आहे. रुद्रने आपलं काम सुरु केलय.
रूद्रच वैशिष्ट्य काय?
20mm टार्गेट गन : मिनिटात शेकडो गोळ्या डागता येतात, ते ही टार्गेटवर नेम धरुन.
70mm रॉकेट पॉड्स : दहशतवादी बिळात लपले तरी रॉकेट हल्ल्याने प्रहार करता येतो.
नाइट विजन + थर्मल कॅमरा : अंधाराताही या कॅमेऱ्याने दहशतवाद्यांना शोधता येतं.
मिसाइल डागण्याची क्षमता : HELINA साख्या अँटी टँक मिसाइलने बंकरही उद्धवस्त करता येतो.
रूद्रने बदलला युद्धाचा गेमप्लान
आधी जमिनीवरुन ऑपरेशन व्हायचं, तेव्हा दहशतवाद्यांना पकडायला वेळ लागायचा. आता रुद्रच्या तैनातीमुळे ‘नो एस्केप ऑपरेशन’ म्हणजे पळता येणार नाही. कोणी खिडकीतून पळाला किंवा जंगलात लपला, तरी रुद्रच्या नजरेतून हे सुटणार नाही. हे हेलिकॉप्टर रणागणात उतरताच दहशतवाद्यांची फायरिंग मंदावली असून हालचाली बंद झाल्या आहेत. त्यांचे इरादे धुळीस मिळाले आहेत.
गोळीबार नाही, तर प्रीसिशन स्ट्राइक
सैन्याचा इरादा स्पष्ट आहे, आता जो बंदुक उचलणार तो वाचणार नाही. रुद्रचा वापर म्हणजे फक्त प्रत्युत्तराचा गोळीबार नाही, तर प्रीसिशन स्ट्राइक असेल. आता दहशतवादी वाचणार नाहीत.
ग्राऊंडवर ऑपरेट करणाऱ्या जवानांना रुद्रकडून रियल टाइम सपोर्ट मिळतोय. दहशतवाद्यांची हालचाल दिसताच गोळीबार सुरु आहे. रुद्र गेमचेंजर ठरणार आहे.
