AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, ग्राहकांचा खिसा रिकामा होणार?

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, ग्राहकांचा खिसा रिकामा होणार?
petrol pumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 8:57 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. जगाला जेवढ्या प्रामाणात कच्चं तेल आणि एलपीजी गॅसची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के कच्चं तेल आणि गॅसची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला आवश्यक असणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. मात्र सध्या हा मार्ग बंद असल्यामुळे आखाती देशातून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारतला बसला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज मार्गे येणाऱ्या कच्च्या तेलाच्या प्रमाणात तब्बल 61 टक्के एवढी घट झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असल्यामुळे सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्याचा विचार करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये 4-5 रुपये प्रति लिटरने वाढ होऊ शकते. तसेच घरगुती एलपीजी गॅसच्या दरात प्रति सिलिंडर 40 ते 50 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरमध्ये सातत्याने वाढ सुरूच आहे. आता सरकार आपला मोर्चा घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोल, डिझेलकडे वळवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात चार ते पाच रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून सरकार तेल कंपनी आणि सरकारच्या तिजोरीवरील दबाव कमी करण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड प्रमाणात भडकले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!