AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरबी समुद्रात भयानक थरार, नौदलाने भारताच्या जहाजाला हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं हायजॅक करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय नौदलाने या प्रकरणी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ ट्विट केलाय. स्पेशल फोर्स ओळख असलेल्या मार्कोस कमांडोंनी ही मोठी कारवाई केली आहे.

अरबी समुद्रात भयानक थरार, नौदलाने भारताच्या जहाजाला हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 05, 2024 | 10:17 PM
Share

चेन्नई | 5 जानेवारी 2023 : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं हायजॅक करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. एमवी लीला नॉरफॉक हे भारतीय नौदलाचं मालवाहू जहाज आहे. समुद्री डाकूंनी या जहाजाचं सोमालिया बंदरावर अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. पण या जहाजाला हायजॅक करण्यात आरोपींना यश आलं नाही. भारतीय नौदलाने एक स्पेशल ऑपरेशन करुन जहाज हायजॅक करणाऱ्यांची पळता भुई थोडी केली. हायजॅकर पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांचा शोध नौदलाकडून सुरु आहे. पण भारतीय नौदलाच्या या धाडसी ऑपरेशनमुळे जहाजामधील 21 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 15 भारतीयांचा समावेश आहे.

भारतीय नौदलाकडून कारवाईचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. स्पेशल फोर्स ओळख असलेल्या मार्कोस कमांडोंनी ही मोठी कारवाई केली आहे. या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या जवानांनी जहाजातील 21 जणांची सुटका केल्यानंतर जहाजाची झडती देखील घेतली आहे. जहाजात कोणतीही संशयास्पद वस्तू तर नाही ना, याची शहानिशा नौदलाकडून करण्यात आली.

भारतीय नौदलाने कारवाई कशी केली?

मार्कोस कमांडोंनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने जेव्हा कारवाईला सुरुवात केली तेव्हा जहाजावर अपहरण करणारे नव्हते. एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी समोर आली होती. समुद्री डाकूंनी हे जहाज हायजॅक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भारतीय नौदलाने ताबोडतोब कारवाईला सुरुवात केली होती. भारतीय नौदलाचं आयएनएस चेन्नई कार्गो शिप तातडीने अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेला गेलं. भारतीय नौदलाने हायजॅकर्सला आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.

भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल आर हरि कुमार यांनी अरबी समुद्रात सक्रिय भारतीय युद्धनौकांना समुद्री लुटारुंच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय समुद्र हद्दीत असणाऱ्या व्यापारी जहाजांना अशा हल्लेखोरांपासून वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...