Indian Railway Ticket: तिकीट नाही खिशात, तरीही ट्रेनचा प्रवास? भारतीय रेल्वेचा नवीन नियम काय?
Indian Railway Traveling Without Ticket: घाई गडबडीत तुम्ही रेल्वेचे तिकीट घरीच विसरले अथवा तिकीट काऊंटरवरून ते खरेदी केले नाही आणि प्रवास सुरू केला तर घाबरू नका. आता नवीन नियमांनी प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

Indian Railway Traveling Without Ticket: तुम्ही रेल्वे काऊंटरवरून (PRS) तिकीट खरेदी केले आणि ते चुकून घरीच विसरलात, तर घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे प्रवाशाला थांबवत नाही, पण त्यासाठी तिकिटाची पडातळणी (Verification) होणे गरजेचे आहे. तिकीट तुम्ही खरेदी केल्याचे एकदा समोर आले की तुम्ही बिनदिक्कतपणे रेल्वेचा प्रवास करू शकता. काय आहे त्यासाठी रेल्वेचा नवीन नियम?
कशी मिळेल मदत?
रेल्वे प्रवासादरम्यान तुमच्या लक्षात आले की, तिकीट घरीच विसरलात तर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मूळ तिकीट (Original) बोर्डिंग रेल्वे स्टेशनवरील अधिकारी, रेल्वे मास्टरकडे ते जमा करावे लागेल. या तिकीटाचा पडताळा झाल्यानंतर पुढील स्टेशनवर हा अधिकारी त्याची पुष्टी करेल. यामुळे अधिकृत तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशाचा प्रवास थांबणार नाही. त्याला कोणत्याही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.
ऑनलाईन तिकीट खरेदीदारांना नाही लागू होणार नियम
ही सुविधा ऑफलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांसाठी आहे. तिकीट काऊंटरवरून तिकीट खरेदी केल्यानंतर ते घरी विसरल्यास ही सुविधा देण्यात आली आहे. रेल्वे रिझर्व्हेशन सिस्टम (PRS) काऊंटरवरून कागदी तिकीट खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुविधा आहे. IRCTC ची साईट अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुक केले असेल तर हा नियम लागू होत नाही. ई-तिकिटाचा पडताळा डिजिटल पद्धतीने होतो. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अगोदरच आहे.
तिकीट विसरला तर काय कराल?
प्रवासादरम्यान तिकीट घरीच विसरल्याचे लक्षात आले तर सर्वात अगोदर रेल्वेतील टीटीईला (Travelling Ticket Examiner) याविषयीची माहिती द्या. तुमच्या घरातील व्यक्तीला मूळ तिकीट घेऊन स्टेशन मास्टरकडे ते जमा करण्यास सांगा. संबंधित स्टेशन मास्तर तिकिटाची खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांना त्याची माहिती देईल. त्यानंतर तुमचा प्रवास कोणत्याही अडथळा, दंडात्मक कारवाईशिवाय सुरू राहिल. अर्थात हा नियम त्या प्रवाशांसाठी आहे, ज्यांनी तिकीट खरेदी केले आहे. पण ते घरी विसरले आहेत. प्रवासी विनातिकीट आढळल्यास, चुकीच्या तिकीटासह प्रवास करताना सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. रेल्वे नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल. रेल्वेत विना तिकीट प्रवास करणे हे नियमबाह्य आहे. त्यासाठी प्रवाशाकडून तिकिटाची रक्कम आणि दंडही वसूल करण्यात येतो. तर रेल्वेत प्रवास करताना सवलतीवर प्रवासही करता येतो. त्यासाठी काही नियम आहेत. त्यातंर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक आणि रुग्णांना तिकिटावर सवलत देण्यात येते.