भारतातील पहिली शाही ट्रेन, एका गावातील सर्वच जण बसू शकतात, वंदे भारत पेक्षाही खास असणार
Indian Railways luxury sleeper train: 16 कोच असलेल्या स्लीपर वंदे भारतमध्ये एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड असे तीन वर्ग असतील. तिची एकूण क्षमता 1,128 प्रवासी आहे, परंतु आठ डबे वाढल्याने तिची प्रवासी क्षमता 1692 पर्यंत वाढेल.

Indian Railways luxury sleeper train: देशात सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत ट्रेन सर्वात लोकप्रिय ठरलेली आहे. यामुळे या ट्रेनची मागणी वाढत आहे. देशभरात सध्या 136 वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. आता भारतीय रेल्वे लवकरच एक खास रेल्वे तयार करणार आहे. ही ट्रेन देशातील सर्वात लग्झरी ट्रेन असणार आहे. या ट्रेनची क्षमता इतकी असणार की एका लहान गावातील लोकसंख्या त्यात समावली जाईल. सुविधांमध्ये ही सध्याच्या वंदे भारत ट्रेनपेक्षा चांगली असणार आहे. रेल्वेने या ट्रेनची निर्मिती कधीपासून सुरु होणार? त्याची तारीख अजून जाहीर केलेली नाही.
सध्या वंदे भारत एक्स्प्रेस शाही सुविधा असलेली देशातील सर्वात आलिशान ट्रेन म्हणजे आहे. ही ट्रेन 136 मार्गांवर धावत आहे. सर्व मार्गांवर धावणाऱ्या या ट्रेनचा ऑक्युपन्सी रेट 100 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे ही ट्रेन आपल्या भागातून सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनिधी करत असतात. तसेच प्रोटोटाइप वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्यासाठी सज्ज आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 50 स्लीपर गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व गाड्यांना 16 डबे असतील. मात्र आता उच्च श्रेणीच्या गाड्याही चालवण्याची तयारी सुरू झाली आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन 24 कोचची असणार
शाही ट्रेनमध्ये जास्तीत जास्तीत प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे 24 कोचची असणार आहे. ही देशातील पहिली शाही ट्रेन असणार ज्यामध्ये सर्वाधिक प्रवाशी बसू शकतात. सध्या काही राजधानी एक्स्प्रेस 24 कोच असणाऱ्या आहेत. परंतु सुविधांबाबत या वंदे भारत एक्स्प्रेसपेक्षाही मागे आहेत. आता सर्वात जास्त प्रवाशी असणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन 24 कोचची बनवण्यात येणार आहे.




प्रवासी क्षमता 1692 जाणार
16 कोच असलेल्या स्लीपर वंदे भारतमध्ये एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड असे तीन वर्ग असतील. तिची एकूण क्षमता 1,128 प्रवासी आहे, परंतु आठ डबे वाढल्याने तिची प्रवासी क्षमता 1692 पर्यंत वाढेल. अद्याप कोणत्याही लक्झरी ट्रेनची इतकी क्षमता नाही. सध्याच्या वंदे भारतपेक्षा ही ट्रेन अधिक आधुनिक असणार आहे. या ट्रेनमध्ये एअर कर्टन, क्रॅश बफर, फायर बॅरियर वॉल, पॅडेड बर्थ आणि ऑनबोर्ड वायफाय या सुविधा असतील.