अखेर 7 पैकी एका गद्दाराची कबुली, सांगितलं पाकसाठी हेरगिरी कशी केली? दूतावासात…
तो व्हॉट्सॲपद्वारे भारतीय सैन्याच्या हालचालींशी संबंधित गोपनीय माहिती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुरवत होता. आता त्याने स्वत: कबुली दिली आहे.

भारतात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. यामध्ये सर्वात मोठे नाव ज्योती मल्होत्राचे आहे. त्यापाठोपाठ देवंद्र सिंह ढिल्लन, नोमान, अरमान, तारीफ, गजाला, यामिन याचाही समावेश आहे. आता या सात पैकी एका हेराना कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या दुतावासातील अधिकाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधून माहिती मागितल्याचे सांगितले आहे.
हरियाणाच्या नूह येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तारीफला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे देखील मान्य केले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या दुतावासातील अधिकाऱ्याने संपर्क साधून महत्त्वाची माहिती मागितल्याचा देखील खुलासा केला आहे. वाचा: पाकिस्तानी एजंट ज्योती मल्होत्रा महिन्याला किती पैसे कमावयची?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची कबुली तारीफने दिली आहे. हरियाणाच्या नूहमधून त्याला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या दुतावासातील अधिकाऱ्याने संपर्क साधून सिरसा एअरबेसचे फोटो आणि व्हिडीओ देण्यास सांगितले होते.
तारीफच्या चॅटमुळे मोठा खुलासा
तारीफवर आरोप आहे की तो व्हॉट्सॲपद्वारे भारतीय सैन्याच्या हालचालींशी संबंधित गोपनीय माहिती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुरवत होता. या प्रकरणात नूह पोलिसांनी भारतीय दंड संहिता, ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट, 1923 आणि देशद्रोहाच्या कलमांतर्गत आरोपी मोहम्मद तारीफ, राहणार कांगरका आणि पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत पाकिस्तानी नागरिक आसिफ बलोच व जाफर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हरियाणाच्या पोलिसांच्या सूत्रांनुसार, गुप्त माहिती मिळाली की तारीफ हा बराच काळ भारतीय सैन्य आणि संरक्षण तयारीशी संबंधित संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला पाठवत होता. तो लोकांना पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी सांगायचा. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याचा मोबाइल जप्त करून तपास केला असता संशयास्पद चॅटिंग समोर आले.
दोन सीमकार्ड वापरायचा
तपासात असे समोर आले की तारीफच्या मोबाइलमध्ये पाकिस्तानी व्हॉट्सॲप नंबरवरून काही डेटा डिलीट झालेला आढळला. त्याच्या मोबाइल फोनच्या तपासात पाकिस्तानी नंबरांवरून चॅट, फोटो, व्हिडिओ आणि सैन्याच्या हालचालींची छायाचित्रे आढळली, जी त्याने पाकिस्तानच्या काही नंबरवर पाठवली होती. तो दोन वेगवेगळ्या सिम कार्डद्वारे पाकिस्तानी नंबरांशी सातत्याने संपर्कात होता. तारीफ दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत कर्मचारी आसिफ बलोच याला भारतातील सैन्याच्या हालचाली आणि गुप्त माहिती पाठवत होता याचा चौकशीत खुलासा झाला आहे.
