Anju in Pakistan : अंजूची पाकिस्तानात 5 स्टार हॉटेलमध्ये फुल पार्टी, हॉटेल मॅनेजरने काय सांगितलं?

Anju Nasrullah Love Story : शूट नंतर अंजू आणि नसरुल्लाह एका हॉटेलमध्ये गेले. दोघे तिथे कितीवेळ होते? काय केलं? या बद्दल त्या हॉटेल मॅनेजरने माहिती दिली आहे. पाकिस्तानी प्रियकरासाठी अंजू भारतातून पाकिस्तानात गेलीय.

Anju in Pakistan : अंजूची पाकिस्तानात 5 स्टार हॉटेलमध्ये फुल पार्टी, हॉटेल मॅनेजरने काय सांगितलं?
anju love with pakistani nasrullah
| Updated on: Jul 27, 2023 | 9:58 AM

लाहोर : सीम हैदरनंतर आता सर्वत्र अंजूची चर्चा आहे. भारताच्या अलवर जिल्ह्यात राहणारी अंजू आता पाकिस्तानच्या अपर दीरमध्ये आहे. अंजू आणि तिचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह यांची लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. दोघांचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. अंजू आणि नसरुल्लाह अपर दीरमधील लोवारी टनल या पर्यटन स्थळी गेले होते. हा सैरसपाटा इथपर्यंतच मर्यादीत नाहीय. तिथे व्हिडिओ शूट केल्यानंतर हे दोघे कुठे गेले? त्या बद्दल TV9 भारतवर्षला माहिती मिळाली आहे.

शूटनंतर अंजू आणि नसरुल्लाह खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील अपर दीरमधील एक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तिथे दोघांनी एक ते दीड तास घालवला.

हॉटेल मॅनेजरने काय सांगितलं?

अंजू आणि नसरुल्लाह ज्या हॉटेलमध्ये गेले होते. तिथल्या मॅनेजरशी TV9 भारतवर्षने संर्पक साधला. त्याने सांगितलं की, “दोघेही तिथे डिनरसाठी आले होते. हे 5 स्टार हॉटेल आहे. अंजू आणि नसरुल्लाह आमच्या हॉटेलमध्ये जेवले” “आमच्या हॉटेलमध्ये प्रत्येक देशातून नागरिक येतात. अमेरिका, ऑस्ट्रेलियन नागरिकही आमच्या हॉटेलमध्ये येतात. इथल्या स्वादीष्ट जेवणाचा ते आनंद घेतात. इथे स्टे करतात” असं या हॉटेल मॅनेजरने सांगितलं.

आम्हाला आधी माहित असतं, तर….

अंजू बद्दल बोलताना मॅनेजरने सांगितलं की, “आमच्यासाठी ती एक सामान्य गेस्ट होती. अंजू भारतातून आलीय, या बद्दल आम्हाला माहित नव्हतं. आमच्याकडे अनेक देशातून नागरिक येतात. त्यांनी डिनर केला. वॉशरुमचा वापर केला. जवळपास तासभर ते इथे होते. सोशल मीडियावर आम्ही फोटोज पाहिल्यानंतर आम्हाला समजलं की, ही भारतातून आलेली अंजू आहे. आम्हाला आधी माहित असतं, तर आम्ही व्हिडिओ, फोटोज काढले असते”

कुठल्या पदार्थांचा आस्वाद घेतला?

अंजू आणि नसरुल्लाहने चिकनच्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. चिकन हंडी, चिकन मखनी आणि सीख कबाब या पदार्थांची ऑर्डर दिली होती.