AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्नी-1, पृथ्वी-2 अन् आकाश प्राइम…, भारताकडून 24 तासांत तीन चाचण्या, टेन्शनमध्ये पाकिस्तान

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या आकाश हवाई संरक्षण प्रणालीने आपली कमाल दाखवली होती. चीन आणि तुर्की ड्रोनचे हल्ले या प्रणालीने अयशस्वी केले होते. आता आकाश प्राइमला लष्कराच्या सल्ल्यानंतर अधिक प्रगत करण्यात आले आहे.

अग्नी-1, पृथ्वी-2 अन् आकाश प्राइम..., भारताकडून 24 तासांत तीन चाचण्या, टेन्शनमध्ये पाकिस्तान
| Updated on: Jul 18, 2025 | 2:42 PM
Share

Triple tests: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून आपले लष्करी सामर्थ्य वेगाने वाढवले जात आहेत. क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. भारताने 16 आणि 17 जुलै रोजी तीन मोठे यश मिळवले आहे. 24 तासांत भारताने तीन चाचण्या केल्या आहेत. यामुळे भारताच्या तंत्रज्ञान शक्तीची पॉवर जगाला दिसली आहे. भारताने एका दिवसात आकाश प्राइम, अग्नी-1 आणि पृथ्वी-2 यांच्या चाचण्या केल्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये आले आहे.

पृथ्वी-2 आणि अग्नी-1 ची चाचणी

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, भारताच्या पृथ्वी-2 आणि अग्नी-1 कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी ठरली. ओडिशामधील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) येथे ही चाचणी करण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांची चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेज कमांड (एसएफसी) च्या देखरेखीखाली झाली.

आकाश प्राइमचे यश

पृथ्वी-2 आणि अग्नी-1 सोबत भारताने आकाश प्राइम या एअर डिफेन्स सिस्टमची चाचणी यशस्वी केली आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीला अधिक चांगली करण्यासाठी ही चाचणी महत्वाची आहे. भारतीय सैन्याने लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर आकाश प्राइम एअर डिफन्स सिस्टमची चाचणी केली. ही एअर डिफेन्स प्रणाली भारतात विकसित केली आहे. यामुळे एकाच दिवसात भारताने तीन चाचण्या यशस्वी करुन संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.

अग्नी-1 हे 1200 किलोमीटर टप्पाचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा वेग 9000 किलोमीटर प्रतितास आहे. तर पृथ्वी-2 क्षेपणास्त्र 350 किलोमीटरपर्यंत अचूक लक्ष्याचा वेध घेतो. हे लिक्विड ईंधनवर चालते. आकाश प्राइम एअर डिफेन्स सिस्टमची चाचणी लष्कराच्या एअर डिफेन्स विंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. डीआरडीओने ही एअर डिफेन्स सिस्टीम विकसित केली आहे. आकाश प्राइमला भारतीय सैन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आकाश रेजिमेंटमध्ये सहभागी करण्यात येणार आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या आकाश हवाई संरक्षण प्रणालीने आपली कमाल दाखवली होती. चीन आणि तुर्की ड्रोनचे हल्ले या प्रणालीने अयशस्वी केले होते. आता आकाश प्राइमला लष्कराच्या सल्ल्यानंतर अधिक प्रगत करण्यात आले आहे. आकाश प्राइम आकाश सिस्टमचे अपग्रेड व्हर्जन आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.