AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indigo Crisis : इंडिगोवर सर्वात मोठ संकट असताना नेदरलँडमध्ये CEO च काय चाललय? व्हिसलब्लोअरचा धक्कादायक दावा

Indigo Crisis : सध्या इंडिगो एअरलाइन्स इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यांची अनेक उड्डाणं रद्द होत आहेत. यासाठी रोस्टर प्रणालीला दोष दिला जात आहेत. आता एका व्हिसलब्लोअरच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालय. त्यातून धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.

Indigo Crisis :  इंडिगोवर सर्वात मोठ संकट असताना नेदरलँडमध्ये CEO च काय चाललय? व्हिसलब्लोअरचा धक्कादायक दावा
Indigo
| Updated on: Dec 08, 2025 | 10:08 AM
Share

देशातील प्रमुख एअरलाइन्स कंपनी इंडिगो इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. दररोज इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द होत आहेत. आता हे संकट केवळ फ्लाइट रद्द होण्यापर्यंत मर्यादीत राहिलेलं नाही. एका मोठा कॉर्पोरेट वाद निर्माण झालाय. मागच्या आठवड्याभरात शेकडो उड्डाणं रद्द झाल्याने सगळेच हैराण झालेत. एका अज्ज्ञात व्हिसलब्लोअरच पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पत्रातून त्याने इंडिगोच्या वरिष्ठ व्यवस्थापनावर खूपच गंभीर आरोप केले आहेत. एअरलाइनच्या संचालनात आलेल्या अडथळ्यासाठी थेट सीईओ पीटर एल्बर्सला जबाबदार धरलं आहे. लेटर लिहिणाऱ्याने स्वत:ला इंडिगोचा कर्मचारी असल्याचं म्हटलं आहे.

इंडिगोवर हे संकट अचानक आलेलं नाही असा पत्रात दावा करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासूनचे चुकीचे निर्णय, कर्मचाऱ्यांवरील वाढता कार्यभार, थकवणारी रोस्टर ड्युटी प्रणाली आणि भितीदायक वातावरणाची कार्यसंस्कृती याचा हा परिणाम आहे असं पत्रात म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांवर इतका दबाव टाकून काम करायला लावलं की, त्यांनी अनेकदा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक सीमा पार केल्या. पण व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही असा पत्रात दावा करण्यात आला आहे. पत्राच्या लेखकाने आपली ओळख, पद किंवा आरोपाच्या समर्थनार्थ कुठलाही ठोस पुरावा सार्वजनिक केलेला नाही. इंडिगोकडून या पत्रातील आरोपांवर अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

संकट आलं, तेव्हा सीईओ कुठे होते?

पत्रात इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स तसेच वरिष्ठ अधिकारी इसिडोर पोर्केरस, आसिम मित्रा आणि जेसन हर्टर यांना या संकटासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. जेव्हा हे संकट आलं, तेव्हा सीईओ एल्बर्स नेदरलँडमध्ये सुट्टयांचा आनंद घेत होता असा पत्रात दावा करण्यात आला आहे.

पत्रातील एक वाक्य सोशल मीडियावर खूप चर्चेत

इतकचं नाही, पत्रात असाही दावा करण्यात आला आहे ती, कंपनीचा प्रवाशांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. ते प्रवाशांकडे आता एक ग्राहक म्हणून नाही तर ओझं म्हणून पाहतात. पत्रातील एक वाक्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तुम्ही त्यांना ‘प्रवाशी म्हटलं तर ते समजणार एअरलाइन त्यांची आहे’ असं पत्रात म्हटलं आहे. कंपनीच्या कथित मानसिकतेकडे इशारा वेधण्याचा व्हिसलब्लोअरचा प्रयत्न आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला