Omicron | ‘ओमिक्रॉन’चा हवाई क्षेत्राला फटका! इंडिगोची अनेक उड्डाणं रद्द, वाचा संपूर्ण यादी

Omicron | ‘ओमिक्रॉन’चा हवाई क्षेत्राला फटका! इंडिगोची अनेक उड्डाणं रद्द, वाचा संपूर्ण यादी
प्रातिनिधीक फोटो

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, आगामी तीन महिन्यांसाठी या मार्गांवर मर्यादित विमानांचे उड्डाणे होणार असल्याची माहिती इंडिगोच्या सूत्रांनी दिली आहे. मर्यादित उड्डाणांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते तसेच विमान कंपन्यांद्वारे भाडेवाढीची शक्यताही नाकारता येत नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 04, 2022 | 6:13 PM

नवी दिल्ली- कोविड बाधितांच्या आकड्याचा आलेख दिवसागणिक उंचावतो आहे. केंद्रीय आरोग्य यंत्रणेने देशात तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. कोरोना आणि ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सार्वजनिक वावरावर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान,हवाई वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo airlines) उड्डाणांच्या संख्येला कात्री लावली आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ‘इंडिगो’ने पश्चिम बंगालवरुन दिल्ली आणि मुंबईच्या दिशेने होणाऱ्या उड्डाणांची संख्या कमी केली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, आगामी तीन महिन्यांसाठी या मार्गांवर मर्यादित विमानांचे उड्डाणे होणार असल्याची माहिती इंडिगोच्या सूत्रांनी दिली आहे. मर्यादित उड्डाणांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते तसेच विमान कंपन्यांद्वारे भाडेवाढीची शक्यताही नाकारता येत नाही.

आठवड्यातून दोन वेळा

सरकारी निर्देशानुसार उड्डाणांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने कोविड-19 प्रादूर्भावाला अटकाव घालण्यासाठी सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधून मुंबई आणि दिल्लीसाठी आठवड्यातून केवळ दोनच दिवस विमानांचे आगमन-निर्गमन होणार आहे.

‘या’ विमानतळावरुन उड्डाण:

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या कोलकाता, दुर्गापूर आणि बगडोगरा वरुन दिल्ली व मुंबई साठी आठवड्यातून केवळ दोन दिवसांसाठी (सोमवार आणि शुक्रवार) विमाने उड्डाण घेतील. आगामी तीन महिन्यांसाठी पश्चिम बंगाल ते मुंबई आणि पश्चिम बंगाल ते दिल्ली या मार्गावर इंडिगोच्या उड्डाणांची संख्या मर्यादित असणार आहे.

प्लॅन बी किंवा रिफंड:

इंडिगोच्या निर्णयामुळे अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. इंडिगोकडून प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्याची सूचना देण्यात आल्या आहेत. तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनी तिकीट भाड्याच्या परताव्यासाठी दावा करण्याचे आवाहन एअरलाईन्सच्या वतीने करण्यात आले आहे किंवा तिकीट रद्द करुन उपलब्ध उड्डाणाची निवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रवाशांना इंडिगो वेबसाइट www.goindigo.in पर जाऊन ‘Plan B’ वर क्लिक करावे लागेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें