AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Travel Insurance : रेल्वेतर्फे मिळतो 10 लाखांचा विमा, तिकीट बुक करताना केवळ ही काळजी घ्या

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटावर अपघात मिळत असतो. यामुळे प्रवाशांना नुकसाई भरपाई मिळत असते. आधी ही रक्कम आठ लाखापर्यंत होती. आता ती दहा लाखांवर केली आहे.

Railway Travel Insurance : रेल्वेतर्फे मिळतो 10 लाखांचा विमा, तिकीट बुक करताना केवळ ही काळजी घ्या
indian railway Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 27, 2024 | 6:53 PM
Share

रेल्वेच्या अपघाताच्या बातम्या अधून मधून येत असतात. तुम्ही देखील रेल्वेतून प्रवास करीत असाल तर रेल्वे देत असलेल्या सुविधांबाबत आपल्याला माहीती हवी. रेल्वेच्या प्रवासात रेल्वे प्रवाशांना ट्रेनच्या तिकीटावर दहा लाखाचा विमा मिळत असतो. याचा अपघाती विम्याचा लाभ मिळण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक करताना काही बाबींची काळजी घ्यायला हवी. रेल्वेची खानपान आणि तिकीट यंत्रणा सांभाळणारी कंपनी आयआरसीटीसी ( IRCTC ) कंपनीच्या तर्फे अनेक सुविधा मिळणार आहेत. ज्यात ट्रॅव्हल्स इंश्योरेंसचा देखील समावेश असतो. प्रवासी विम्याचा फायदा घेण्यासाठी काही बाबींची काळजी घ्यायला हवी. प्रवाशांना हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचे तिकीट कन्फर्म झाले तर ही सुविधा मिळतेच शिवाय RAC झाले तरी या सुविधेचा ते वापर करु शकतात. परंतू तिकीट जर कन्फर्म झाले नसेल तर मात्र तुम्हाला या अपघाती विमा लागू होत नाही.

कसा मिळतो फायदा

भारतीय रेल्वेतून रोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. अनेकदा अपघात होत असतात. अशावेळी प्रवाशांनी जर तिकीट बुकींग करताना प्रवासी विमा हा पर्याय निवडला असला तर प्रवाशांच्या वारसदारांना दहा लाखाची भरपाई मिळते.तिकीट खिडक्यांवरुन ऑफ लाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांना हा लाभ मिळत नाही.

योग्य पद्धतीने नॉमिनी डिटेल्स भरा

ट्रेनचा अपघाती विमा लागू होण्यासाठी केवळ आपल्या खिशातून 45 पैसे कापले जातात. यात तु्मच्या वारसदारांना सात ते दहा लाखाची नुकसान भरपाई दिली जाते. प्रवासात जरी अपघातात मृत्यू झाला तर रेल्वेच्या वतीने नातेवाईकांना 10 लाखाची भरपाई दिली जाते. आपण तिकीट बुक करताना नॉमिनी डिटेल्स योग्य प्रकारे भरायला हवे. नॉमिनी डीटेल्स भरताना ईमेल आयडी देखील टाकावा. अनेक लोक एजंटच्या द्वारा तिकीट बुक करीत असतात. अशा वेळी एजंटला आपले नाव आणि ई-मेल आयडी टाकायला सांगा. त्यामुळे अपघातानंतर क्लेम करण्यासाठी काही अडचणी येणार नाहीत.

अपघातानंतर चार महिन्याच्या आत नॉमिनी व्यक्तीने किंवा जवळच्या नातेवाईकांनी क्लेम केला पाहीजे. ज्या कंपनीला रेल्वेने कंत्राट दिले आहे. त्या कंपनीकडे सर्व डिटेल्स भरावे लागतील. क्लेम केल्यानंतर काही दिवसात पैसे वारसदारांना मिळतात.

जखमींना 2 लाख आणि मृत्यू झाल्यास 10 लाख

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार प्रवासादरम्यान जर कोणाचा मृत्यू झाल्यास तर त्याच्या कुटुंबियांना 10 लाखापर्यंत विम्या कव्हर मिळते. तसेच अंशत: विकलांगता आल्यास 7,50,000 पर्यंतची रक्कम जखमींना मिळते. जखमी झाल्यास 2 लाखापर्यंतचा खर्च मिळतो. तर किरकोळ जखम झाल्यास 10हजारापर्यंतची नुकसान भरपाई म्हणून मिळते.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.