मोठी बातमी! युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला जबरदस्त ऑफर, थेट मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी आता इराणसोबतचे चर्चेचे सर्व रस्ते बंद झाले आहेत, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती, मात्र आता त्यानंतर त्यांनीच इराणला मोठी ऑफर दिली आहे.

मोठी बातमी! युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला जबरदस्त ऑफर, थेट मोठी घोषणा
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 10:09 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणंच प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराण शरण येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं आहे. इराणकडे ‘बिनशर्त सरेंडर’शिवाय इतर कोणताही पर्यात नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते बिनशर्त सरेंडर आल्याशिवाय त्यांच्यासोबत कोणतीही डील होणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान इस्त्रालयने इराणवर हल्ला केला आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये अमेरिकेनं देखील उडी घेतली. आज युद्धाचा सातवा दिवस आहे, आता सातव्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. इराणसोबत आता ‘बिनशर्त सरेंडर’ शिवाय कोणतीही डील होणार नाही, जर इराण बिनशर्त सरेंडर झालं तर आम्ही तिथे एका महान नेत्याची निवड देखील करू, सध्या इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, त्यातून बाहेर काढून आम्ही इराणला जगातील एक महान देश बनवू , असं मी वचन देतो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान युद्ध सुरू होण्यापूर्वी मात्र ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती, आता इराणसोबत चर्चेची वेळ संपली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली?

ट्रम्प यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आता इराणकडे बिनशर्त आत्मसर्पणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. जोपर्यंत ते बिनशर्त आत्मसर्पण करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतीही डील होणार नाही. जर इराणने सरेंडर केलं तर तिथे आम्ही एका महान नेत्याची निवड करू तसेच उद्ध्वस्त झालेल्या इराणला जगातील एक महान देश बनवू, ईराण आर्थिक दृष्या एक मजबूत देश म्हणून जगासमोर येईल. इराणचं भविष्य उज्वल असेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us