इराणचं युद्धविरामाबाबत सर्वात मोठं वक्तव्य, आमचा पाकिस्तानवर विश्वास नाही, फक्त आमचा मित्र भारतच यावर…, नेमकं काय म्हटलं?

पाकिस्तानकडून युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र आता इराणने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे, आमचा पाकिस्तानवर विश्वास नसल्याचं इराणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भारताबाबत देखील मोठं विधान केलं आहे.

इराणचं युद्धविरामाबाबत सर्वात मोठं वक्तव्य, आमचा पाकिस्तानवर विश्वास नाही, फक्त आमचा मित्र भारतच यावर..., नेमकं काय म्हटलं?
motzaba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 30, 2026 | 7:29 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. पाकिस्तानकडून तसे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. मात्र पाकिस्तानला यामध्ये यश आलं नसून पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. अमेरिकेनं युद्धविराम करण्यासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून इराणकडे 15 सुत्री कार्यक्रम पाठवला होता, मात्र तो देखील इराणने फेटाळून लावला आहे. इराने पाकिस्तानला डावल्यानंतर देखील आता पाकिस्तानकडून काही मुस्लिम देशांना एकत्र करून बळजबरीने या प्रकरणात घुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. इराणमधील सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणने भारताला आपला मित्र देश म्हटलं आहे. पाकिस्तानवर आमचा विश्वास नाही, मात्र अमेरिकेसोबत युद्धविरामाच्या मध्यस्थीसाठी आम्ही भारतावर भरोसा करू शकतो असं इराणने म्हटलं आहे.

इराणने नेमकं काय म्हटलं?

सीएनएन न्यूज 18 च्या एका रिपोर्टनुसार इराणने भारत आमचा मित्र राष्ट्र असल्याचं म्हटलं आहे. भारत युद्धविरामाच्या चर्चेत सहभागी होऊ शकतो. पाकिस्तानकडून अमेरिकेसोबतच्या चर्चेसाठी पुढाकार घेण्यात येत आहे, मात्र आमचा पाकिस्तानवर विश्वास नाही. पाकिस्तानकडून ज्या पद्धतीने प्रयत्न होत आहे, ते पाहून आम्हला वाटंत की पाकिस्तान बळजबरीने युद्धविरामाचं श्रेय घेऊ इच्छित आहे., असंही यावेळी इराणने म्हटलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार असा दावा करण्यात येत आहे की, इराणने युद्धविरामासाठी पुढाकार घेतला आहे, त्यांना युद्धविराम करायचा आहे. यावर देखील इराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही यावर कधीही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही, त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नाही, असंही यावेळी इराणने म्हटलं आहे.

दरम्यान इराणची प्रतिक्रिया ही अशावेळी आली आहे, ज्यावेळी पाकिस्तानकडून जगातील काही शक्तिशाली मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना एकत्र करून अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामची चर्चा होऊ शकते असंही पाकिस्तानने म्हटलं होतं. त्यापूर्वी पाकिस्तानने सौदी अरब, तुर्कस्थान आणि मिस्त्र यांच्यासोबत देखील चर्चा केली होती.

 

Follow Us