AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा

इराणमधून मोठी बातमी समोर येत आहे, इराणला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या प्रशासनाकडून आपल्याच दोन टॉपच्या नेत्यांवर देशासोबत गद्दारी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना आता अटक होण्याची शक्यता आहे.

सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला..., इराणला मोठा हादरा
Iran Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 04, 2026 | 6:37 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन एक महिना झाला आहे. मात्र अजूनही युद्धविराम झालेला नाही. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, या तणावाचा मोठा फटका हा जगातील जवळपास सर्वच देशांना कोणत्या न कोणत्या रुपात बसत आहे. हे युद्ध आता लवकरात लवकर थांबावं अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे. मात्र इराण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेसोबत युद्धविराम करण्यास तयार नाहीये. अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव देखील इराणने फेटाळून लावला आहे, आता आमच्या अटींवरच युद्धविराम होईल असं इराणने म्हटलं आहे.

मात्र आता इराणमधून मोठी बातमी समोर आली आहे, ही बातमी समोर येताच इराणला जबरदस्त हादरला बसला आहे. तो म्हणजे इराणच्या माजी राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्र्यांवर आपल्याच देशासोबत गद्दारी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ आणि माजी राष्ट्रपती हसन रूहानी यांच्यावर देशासोबत गद्दारी केल्याचा तसेच ते अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा इराणसाठी मोठा झटका मानला जात आहे.

इराणचे माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी युद्धविरामासाठी पुढाकार घेत अमेरिकेला एक युद्धबंदीचा प्रस्तावर पाठवला होता. त्यानंतर आता जवाद जरीफ यांच्यावर अमेरिकेचे एजेंट असल्याचा आरोप होऊ लागला आहे. तसेच मोहम्मद जवाद जरीफ आणि माजी राष्ट्रपती हसन रूहानी यांच्याविरोधात इराणच्या रस्त्यांवर जोरदार आंदोलन देखील सुरू झाले असून, इराणच्या प्रशासकांना या दोन्ही नेत्यांबद्दल संशय आहे.

दरम्यान इराणच्या स्थानिक मिडिया रिपोर्टनुसार याविरोधात इराणचे खासदार हामिद रसाई यांनी कोर्टात धाव घेतली असून या दोन्ही नेत्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मोहम्मद जवाद जरीफ यांचं विधान हे देशाविरोधात आहे, असा दावा त्यांनी कोर्टात केला आहे. दरम्यान त्यानंतर आता इराणमध्ये जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नागरिक रस्त्यावर उतरले असून, या दोन्ही नेत्यांच्या अटकेची मागणी सुरू आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?