AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

याचिका दाखल करणाऱ्या तेलगू भाषिक नागरिकाचा टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याआधीची याचिका फेटाळताना टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला राष्ट्रभाषेचा ज्ञान असायलाच पाहिजे, असे महत्वपूर्ण मत नोंदवले होते.

Supreme Court : भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 19, 2022 | 11:51 PM
Share

नवी दिल्ली : देशाची राष्ट्रभाषा हिंदी (Hindi)ला दक्षिणेकडील राज्यांमधून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)त एक याचिका (Petition) दाखल झाली आहे. या याचिकेतून हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हैदराबादमधील एका तेलगू भाषिक व्यक्तीने ही याचिका दाखल करून हिंदीला राष्ट्रभाषा मानण्यावर आक्षेप घेतला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने हिंदी हीच देशाची राष्ट्रभाषा असल्याचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. (Is Hindi the national language of India, Petition filed in the Supreme Court)

मुंबई हायकोर्ट म्हणाले होते, टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्यांना राष्ट्रभाषेचा ज्ञान हवे!

याचिका दाखल करणाऱ्या तेलगू भाषिक नागरिकाचा टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याआधीची याचिका फेटाळताना टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला राष्ट्रभाषेचा ज्ञान असायलाच पाहिजे, असे महत्वपूर्ण मत नोंदवले होते. याचिकाकर्त्याला हिंदी भाषा समजत नाही. त्याला केवळ तेलगू भाषेचे ज्ञान असल्याचे म्हणणे त्याने मांडले होते. अंमली पदार्थ विरोधी सेलने त्याला ताब्यात घेतले होते. तपास अधिकाऱ्यांनी त्याला फक्त तेलगु भाषा येत असतानाही चौकशीदरम्यान त्याच्या संवैधानिक हक्कांबाबत हिंदीमध्ये माहिती दिली होती. त्यावर त्याने आक्षेप घेत अमली पदार्थविरोधी कारवाईत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.

याचिकाकर्त्या व्यावसायिकाच्या गाडीत सापडली होती अवैध दारू

हैदराबाद येथील याचिकाकर्ता गंगम सुधीर कुमार रेड्डी यांचा टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला मुंबईतून अटक केली होती. रेड्डी यांच्या गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू सापडली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) त्यांना संवैधानिक अधिकारांबद्दल हिंदीमध्ये माहिती दिली होती. रेड्डी यांना फक्त तेलगू समजते. या प्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, यासंबंधीत संवैधानिक हक्कांची संपूर्ण माहिती केवळ राष्ट्रभाषेत देण्यात आली आहे. याचवेळी तपास पथकाने एनडीपीएस कायद्याच्या कलम 50 मधील तरतुदीचे पालन केले नसल्याचा दावा रेड्डी यांनी केला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रेड्डी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तुमचा टूर आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. तुम्हाला राष्ट्रभाषेचे ज्ञान असणे आवश्यकच आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला दिलासा देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सुनावले होते.

दिल्ली उच्च नायालयाने काय म्हटलेय?

मुंबई उच्च न्यायालयाने हिंदी हीच राष्ट्रभाषा असून नागरिकांना, विशेषतः टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्यांना ही भाषा अवगत असलीच पाहिजे, असे म्हटले आहे. याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने वेगळा सूर व्यक्त केला आहे. अलीकडील एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने भाषेबाबत मत मांडले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की कलम 22(5) नुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकारांची माहिती त्याला चांगल्याप्रकारे समजेल अशाच भाषेत दिली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन उच्च न्यायालयाची भिन्न मते समोर आली आहे. या अनुषंगाने आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Is Hindi the national language of India, Petition filed in the Supreme Court)

इतर बातम्या

Solapur Crime : सोलापुरातील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा; महिलेला जीवे मारण्याचाही केला प्रयत्न

Hariyana Rape & Murder : हरियाणात अल्पवयीन मुलीची हत्या करुन बलात्कार, दोषींना फाशीची शिक्षा

Follow Us
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?