AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monalisa Pregnancy : व्हायरल गर्लच्या केसमध्ये नवा ट्विस्ट, मोनालिसा होणार आई ? पती फरमानने..

Viral Girl Monalisa Pregnant : प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आलेली मोनालिसा भोसले आणि फरमान यांना अटक करण्यासाठी कोचीमध्ये आलेले मध्य प्रदेश पोलीस रिकाम्या हाताने परतले आहेत. फरमानने आपल्या पत्नीच्या गरोदरपणाचे कारण दिलं आहे.

Monalisa Pregnancy : व्हायरल गर्लच्या केसमध्ये नवा ट्विस्ट, मोनालिसा होणार आई ? पती फरमानने..
व्हायरल गर्ल मोनालिसा
| Updated on: Apr 21, 2026 | 1:09 PM
Share

Monalisa Pregnancy News : प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान यांचं प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीत अडकलंय. मध्य प्रदेशातील महेश्वर येथून केरळमधील कोची येथे गेलेलं पाच सदस्यीय पोलीस पथक रिकाम्या हाताने परतलं. कारण आता गर्भधारणा आणि वयाच्या वादावरून या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरमान आणि मोनालिसा यांना ताब्यात घेण्यासाठी महेश्वर पोलिसांचे एक पथक (ज्यात एका महिला उपनिरीक्षकाचाही समावेश होता) कोचीला पोहोचले होते.

मात्र, मोनालिसा ही गरोदर आहे आणि त्यामुळेच ती प्रवास करण्यास किंवा तात्काळ पोलिसांसमोर हजर राहण्यास असमर्थ असल्याचं तिचा मोहम्मद फरमान याने पोलिसांना कळवलं. तिच्या गरोदरपणाबद्दल समदल्यानंतर मानवतेच्या आधारावर आणि कायदेशीर अडचणींमुळे एमपी पोलीस पथकाला घटनास्थळावरून परतावं लागलं. मात्र, पोलीस या प्रकरणाचा पुढे निश्चितच तपास करणार आहेत.

अल्पवयीवन की प्रौढ ? वयाबाबत पेच कायम

हा संपूर्ण वाद मोनालिसाच्या वयावरून निर्माण झाला आहे. तिच्या वडिलांनी मध्य प्रदेशातील महेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मोनालिसा केवळ 16 वर्षांची असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) तपासातही मोनालिसा अल्पवयीन असल्याचे आढळून आले. या आधारावर, पोलिसांनी तिचा पती, फरमानवर पॉक्सो कायदा, अपहरण आणि अनुसूचित जाती/जमाती कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र मी 16 नव्हे तर 18 वर्षांची असून 11 मार्च रोजी तिरुवनंतपुरम येथील एका मंदिरात माझ्या मर्जीने फरमानशी लग्न केलंय, असा दावा मोनालिसा हिने केला आहे.

केरळ कोर्टाकडून दिलासा

मध्य प्रदेश पोलिसांच्या कारवाईदरम्यान, केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फरमानला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने फरमानविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला 20 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. या न्यायालयाच्या आदेशामुळे आणि मोनालिसाच्या कथित प्रकृतीमुळे, मध्य प्रदेश पोलीस कोचीमध्ये असूनही त्या दोघांना अटक करू शकले नाहीत.

मुख्यमंत्र्यांकडे केली सुरक्षेची मागणी

मध्य प्रदेश पोलीस कोचीमध्ये दाखल होताच, मोनालिसाने केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन आणि कोची पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून संरक्षणाची विनंती केली. मला जबरदस्तीने मध्य प्रदेशात नेण्याचे प्रयत्न होऊ शकतात, असा आरोप तिने केला. मला पतीसोबत केरळमध्ये सुरक्षितपणे राहायचे आहे असंही तिने म्हटलं होतं.

पोलीस केवळ त्या जोडप्याचाच नव्हे तर फरमानचा मित्र जोशुआ याचाही शोध घेत आहेत. या जोडप्याला केरळमध्ये लपायला मदत करणे, त्यांच्या राहण्याची आणि लग्नाची व्यवस्था केल्याचा आरोप जोशुआवर आहे. तोही सध्या फरार असून पोलिसांकडून त्याा शोध सुरू आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...