पाकिस्तानात मावशीच्या मुलीशी निकाह केला आणि बनला पाकचा ISI एजंट, धक्कादायक कहाणी

पाकिस्तान आणि भारत या एकमेकांना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या शत्रू राष्ट्राचे वैर जगप्रसिद्ध आहे. एका भारतीय तरुणाला पाकिस्तानला गुप्त माहीती पुरविल्या प्रकरणात कानपूर कोर्टाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानात मावशीच्या मुलीशी निकाह केला आणि बनला पाकचा ISI एजंट, धक्कादायक कहाणी
kanpur isi agentImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 2:53 PM

कानपूर | 3 मार्च 2024 : उत्तर प्रदेशातील कानपूर कोर्टाने एका आयएसआय एजंटला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानला गुप्त माहीती पुरविणाऱ्या या एजंटने आपल्या देशातील सैन्याच्या ठिकाणांची माहीती पाकिस्तानातील आपल्या म्होरक्यांना पुरविण्यासाठी स्वत:ची कोड लॅंग्वेज तयार केली होती. या लॅंग्वेजला कोणी डीकोड करु नये यासाठी त्याने शहरांना कोड नेम दिले होते. या एजंटला दहशतवाद विरोधी पथकाने 18 सप्टेंबर 2011 रोजी कानपूरच्या मुरे कंपनी पुलाजवळ अटक केली होती. हा परिसर कानपूर सैन्य छावणी अंतर्गत मोडत आहे. एटीसला या एजंटकडून भारतीय सैन्यांसंदर्भात गुप्त दस्ताऐवज सापडले आहेत.

या एजंटचे नाव फैसल रहमान असून त्याने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आहे. भारताच्या सैन्याबद्दल माहीती देण्याच्या बदल्यात त्याला भरपूर पैसा मिळत होता. त्याच्या चौकशीत एटीएसला महत्वाची माहीती मिळाली आहे. फैसल याने रांची, प्रयागराज, बबीना, कानपूर कॅंटोनमेंट याची माहीती पाकिस्तानला पुरविली होती. फैसल मुळचा रांचीचा रहीवासी होता.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी फैसल याला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाने 11 साक्षीदारांना कोर्टात सादर केले होते. त्याने आपल्या बचावात सांगिकते की त्याचे लग्न पाकिस्तानात झाले होते. त्यामुळे त्याला अडकविले जात आहे. वास्तविक तो अकरा वर्षांपासून तो बायकापोरांना भेटलेला नाही. कोर्टाने त्याचे जबाब ग्राह्य न मानता त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अशी होती कोड भाषा

भारतीय सैन्य क्षेत्राची माहीती पाकला पुरविण्यासाठी त्याने कोडींग लॅंग्वेज तयार केली होती. त्यामुळे एखादा संदेश जरी पकडला गेला तरी कोणाला काही कळू नये यासाठी त्याने सांकेतिक भाषा तयार केली होती. त्याने झॉंशीला राणी, बबीनाला बीवी, पुण्याला पुनीत असे सांकेतिक पर्यायी शब्द तयार केले होते. कानपूरला वाहन नोंदणी क्रमांक प्रमाणे UP78 असा कोड वर्ड दिला होता. सैन्य युनिटना बेटा, नातू आणि नात नावाचे कोड वर्ड त्याने ठरविले होते.

पाकिस्तानात शादी

फैसल याने आपण रशियाला उच्च शिक्षणासाठी गेलो होतो. तेथून आल्यानंतर आपण आपल्या मावशीला भेटायला पाकिस्तानात गेलो तेव्हा मावशीची मुलगी सायमा हीच्या प्रेम जुळले आणि त्याने लग्न केले. सायमा सरकारी कॉलेजात प्रोफेसर होती. त्यामुळे तिला भेटायला आपण पाकिस्तानात जायचो असे त्याने म्हटले आहे. आपण व्हीसाची मुदत वाढविण्यासाठी पाकिस्तानात गेलो असता तेथे एका आयएसआय एजंटने त्याला भारताबद्दल भडकवून एजंट म्हणून काम करण्याची ऑफर दिल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडून दस्ताऐवज आणि सवा लाख रुपयांची रोकड बॅंकेतून जप्त करण्यात आली होती.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.