AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध सुूरू असतानाच इस्रायलची भारतासाठी सर्वात मोठी घोषणा; चीन, पाकिस्तानला घाम फुटला, भारताच्या ताकदीमध्ये प्रचंड वाढ

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव आहे. मात्र त्यातच आता इस्त्रालयने भारतासाठी मोठी घोषणा केली असून, त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.

युद्ध सुूरू असतानाच इस्रायलची भारतासाठी सर्वात मोठी घोषणा; चीन, पाकिस्तानला घाम फुटला, भारताच्या ताकदीमध्ये प्रचंड वाढ
Binyamin NetanyahuImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 3:00 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने आतापर्यंत आपले अनेक टॉप कमांडर या युद्धात गमावले आहेत. तसेच इराणमधील पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे इराणने देखील हार मानलेली नाहीये. इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकीनऊ आणले आहेत. विशेष म्हणजे इराणने अमेरिकेचं F 35 फायटर जेट उडवलं आहे. या फायटर जेटचं वैशिष्ट म्हणजे हे विमान रडारला देखील सापडत नाही, ते विमान उडवण्याचं काम इराणने केलं आहे. दरम्यान मध्य पूर्वेत विमानाचा भडका उडाला असतानाच आता भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रालयने भारतासोबत मोठी डील केली असून, या डीलमुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

इस्त्रायलची AI रोबोटिक्स कंपनी XTEND ने भारताची कंपनी Rayonix Tech सोबत तब्बल 11 मिलियन डॉलरचा मोठा करार केला आहे. या करारातंर्गत या दोन्ही कंपन्या मिळून स्थानिक पातळीवर अनमॅन्ड एरिअल व्हेकल्स (UAVs) चं उत्पादन करणार आहेत. हा भारतासाठी एक मोठा संरक्षण क्षेत्रातील करार आहे. कारण या करारातंर्गत जे ड्रोन तयार होणार आहेत, ते AI ऑपरेट करणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका वृत्तानुसार Rayonix ही कंपनी भारतात XTEND या इस्त्रायलच्या कंपनीची पार्टन असणार आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे. कारण सध्याच्या युद्धांमध्ये ड्रोनच महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलं आहे.

सध्या सुरू असलेलं इस्त्रायल, अमेरिका आणि इराणचं युद्ध असू द्या, किंवा काही दिवसांपूर्वी झालेलं इस्त्रायल, इराण युद्ध असेल. एवढंच नाही तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या डीलचा मोठा फायदा हा भारताला होणार आहेत. आता या करारातंर्गत भारतामध्येच जगातील सर्वात घातक ड्रोन बनवले जाणार आहेत. ज्या ड्रोनला एआय ऑपरेट करणार आहे.

Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर