
ISRO satellite: भारत ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत चीनचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. अवकाशातून भारताची देखरेख अधिक प्रभावी होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग सॅटेलाइटला सूर्याच्या समकालिक कक्षेत नेणारा पीएसएलव्ही-सी61 मिशन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.59 वाजता हे प्रक्षेपण होणार आहे.
भारताचा देखरेख ठेवणारा उपग्रह अधिक चांगली माहिती देणार आहे. EOS-09 अत्याधुनिक सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज आहे. यामुळे विपरीत हवामानाची पर्वा न करता पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन फोटो कॅप्चर करणे शक्य होणार आहे. हा उपग्रह भारताच्या पाकिस्तान आणि चीनसोबतच्या संवेदनशील सीमांवर देखरेख वाढवणार आहे. तसेच सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
RISAT-1B चे सी-बँड सिंथेटिक एपर्चर रडार या अडथळ्यांवर मात करू शकते. घुसखोरी शोधण्यासाठी, संशयास्पद शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दहशतवादविरोधी अभियानासाठी त्याची भूमिका महत्वाची आहे. सीमेवर तणाव वाढत असताना सतत आणि विश्वासार्ह गुप्त माहिती प्रदान करण्याची उपग्रहाची क्षमता भारतीय सुरक्षा दलांसाठी महत्वाची आहे.
RISAT-1B या मध्ये पाच वेगवेगळे इमेजिंग मोड आहे. लहान वस्तूंचा शोध घेण्यासाठी अल्ट्रा-हाय- रिजॉल्यूशन इमेजिंगचा वापर करणार आहे. तसेच मोठा भाग दाखवण्यासाठी स्कॅनच्या दरम्यान स्विच करण्याची सुविधा आहे. सैन्य आणि नागरी दोन्ही ठिकाणी त्याचा वापर करता येणार आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात इस्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोच्या उपग्रह नेटवर्कमधील माहितीच्या मदतीने भारतीय सैन्याने लष्करी रडार प्रणाली नष्ट केली. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवले. भारताने या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त केली. त्यासाठी उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीचा मोठा उपयोग झाला.