पाकिस्तानला दिलेल्या उत्तरातून भारताने जगाला दिला संदेश, दाखवली आपली ताकद, नेमके कसे झाले ऑपरेशन सिंदूर
भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या माध्यमातून भारताने आपल्या सर्व प्रगत आणि स्वदेशी लष्करी उपकरणांची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे भारताकडे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत, हे सिद्ध झाले. भारताने भारत-पाकिस्तान संघर्षात भारताने राफेल, तेजस आणि आकाश क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानवर कहर केला आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष थांबवण्याचा निर्णय शनिवार घेण्यात आला. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धविराम करण्याची घोषणा केली. त्याचवेळी भारताने सीमेपलीकडून काहीही कारवाई झाली तर भारत ठोस प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करत ९ अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताचे ऑपरेशन सिंदूर कमालीचे यशस्वी झाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. अगदी पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पडले. त्यामुळे पाकिस्तानकडे आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने जोरदार कामगिरी केली. स्वदेशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्रे, बराक-८ एमआरएसएएम, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान आणि हारोप ड्रोन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने संरक्षण यंत्रणेद्वारे जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे.
सलग तीन दिवस सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानने शेकडो ड्रोन वापरून भारताच्या संरक्षण यंत्रणा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानच हा प्रयत्न भारताने उधळून लावला. पाकिस्तानच्या मध्यम ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे सर्व नापाक प्रयत्न अयशस्वी ठरले. एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने सर्व हल्ले पूर्णपणे हाणून पाडले आहेत.
भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या माध्यमातून भारताने आपल्या सर्व प्रगत आणि स्वदेशी लष्करी उपकरणांची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे भारताकडे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत, हे सिद्ध झाले. भारताने भारत-पाकिस्तान संघर्षात भारताने राफेल, तेजस आणि आकाश क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानवर कहर केला आहे. त्याच वेळी पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे अयशस्वी ठरली. भारतीय हवाई दलाने जागतिक स्तरावर आपली क्षमता दाखवून दिली आहे.
भारताच्या हवाई हल्ल्यात लाहोरस्थित मुख्यालय-९ हवाई संरक्षण युनिट आणि अनेक रडार नष्ट करण्यात आले. भारताच्या प्रगत लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर अचूक मारा करून त्यांना नष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कारी अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक होणार आहे.
